कोल्हापूर

शेतकरी संघ ४० लाखांच माल २० लाखाला

CD

चाळीस लाखांचा माल परस्पर विकला वीस लाखांना
शेतकरी संघाच्या उर्जितावस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह : ग्रीस, आॅईल खरेदीच्या निम्म्या किमतीला विक्री

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : शेतकरी संघाला उर्जितावस्था द्यायला आलेल्या पदाधिकाऱ्यांनी संघाच्या सात पेट्रोल पंपांवरील ग्रीस, ऑईलसह सुमारे ४० लाख रुपयांचे पेट्रोलियम पदार्थ २० लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोणतीही निविदा, संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव नसतानाही एवढ्या कमी किमतीला हे पदार्थ विक्री झाल्याचे दिसत आहेत.
शेतकरी संघाला तोट्यातून बाहेर काढले पाहिजे, संघाची खत, इंधन, मसल्यासह इतर विक्री वाढली पाहिजे, संघ पुन्हा एकदा फायद्यात आला पाहिजे, यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आघाडीने शेतकरी संघाच्या निवडणुकीत आपला झेंडा रोवला. संघात पै-पै ची काटकसर करणे गरजेचे आहे. संघाकडे असणारी उत्पादने किंवा पेट्रोलियम पदार्थांची चांगली विक्री झाली पाहिजे, यासाठी संघाचे पदाधिकारी आपापल्या नेत्यांशी बांधिल आहेत; मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेला माल विक्री होत नाही, त्याला योग्य किंमत येत नाही, इतर कंपन्यांच्या तुलनेत संघाकडे असणारा ग्रीस, ऑईलसह इतर पदार्थ महाग असल्याने कोणाची मागणी येत नाही, असे कारण सांगून कोणतीही निविदा न काढता सुमारे ४० लाख रुपयांचे पेट्रोलियम पदार्थ निम्म्या म्हणजेच २० लाख रुपयांना विक्री करण्याचे धाडस पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी केले आहे. एखादी वस्तू ना नफा, ना तोटा तत्वावर जरी विक्री केली तरीही संघाने गुंतवणूक केलेली मूळ रक्कम मिळू शकते; मात्र या विक्रीमध्ये संघाला किती फायदा झाला आणि किती तोटा झाला हे नेत्यांनाच संघातील पदाधिकाऱ्यांना विचारावे लागणार आहे.
संघाकडे सात पेट्रोल पंप आहेत. याठिकाणी २०१८ दरम्यान ग्रीस व इंजिन ऑईलसह काही पदार्थ खरेदी केले होते. या खरेदीची सर्व रक्कम त्याचवेळी संबंधित कंपनीला दिली आहे. दरम्यान, हे पदार्थ विक्री करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह विद्यामानसह पूर्वीच्या संचालकांनीही पुढाकार घेणे जरुरीचे होते; मात्र असे झाले नाही. आता या पदार्थांना मागणी नसल्याचे कारण दिले जात आहे. संघाकडून महाग किमतीने ग्रीस, ऑईल घेण्यास कोणी तयार नाही, अशी कारणे सांगितली जात आहेत. वस्तू पडून राहण्याऐवजी विक्री केलेली बरी म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी ‘लाखाचे बारा हजार’ करत संघाच्या सुमारे ४० लाख रुपये पेट्रोलियम पदार्थांची वीस लाखांना विक्री केल्याची चर्चा रंगली आहे.

कोट
विद्यमान नूतन संचालकांनी संघाची १ कोटी रुपयांची कर्जाची परतफेड केली आहे. तसेच, संघात ग्रीस, ऑईलसह इतर पदार्थ महाग आहेत, म्हणून त्यांची विक्री होत नव्हती. त्यामुळे या वस्तू निम्म्या किमतीने विकाव्या लागल्या आहेत. हा सर्व माल खराब होण्यापेक्षा किंवा विक्रीविना पडून राहण्यापेक्षा विक्री करावा लागला आहे.
-सचिन सरनोबत,
कार्यकारी संचालक, शेतकरी सहकारी संघ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT