कोल्हापूर

पाऊस बातमी

CD

ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ
नदीची पाणी पातळी घटली, २८ बंधारे पाण्याखाली.

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : जिल्ह्यात पावसाने सलग तिसऱ्या दिवशी सुटी घेतली. दिवसभरात किरकोळ सरींचा अपवाद सोडला तर पाऊस पडला नाही. शहरासह परिसरात दिवसभर ऊन आणि पाऊस असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. गेल्या ४८ तासांत पंचगंगा नदीची पाणी पातळी १० फुटांनी कमी झाली असून, रात्री ९ वाजता राजाराम बंधारा येथे पाणी पातळी २१ फूट ९ इंच इतकी होती. राधानगरी धरणातून आज १३०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सक्रिय झालेल्या मॉन्सूनने दडी मारली आहे. कोकणात धुवाधार पाऊस पडत असला तरी घाटमाथ्यावर फारसा पाऊस नाही. धरणक्षेत्रात तुरळक पाऊस पडला आहे. अन्यत्र मात्र पावसाने विश्रांतीच घेतली. पाऊस नसल्याने नद्यांची पाणी पातळी घटली असून, बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. सध्या केवळ २८ बंधारे पाण्याखाली आहेत.
-----------------------------------------------
चौकट
धरणातील पाणीसाठा (आकडे टीएमसीमध्ये)
राधानगरी - ३.९७
तुळशी - १.७७
वारणा - १७.३२
दूधगंगा - ८.८५
कासारी - १.२६
कडवी - १.७२
कुंभी - १.१४
पाटगाव - २.३८
चिकोत्रा - ०.५२
चित्री - १.११
जंगमहट्टी - १.००
घटप्रभा - १.५६
जांबरे - ०.८२
आंबेआहोळ - १.०१
सर्फनाला - ०.२८
कोदे लघु प्रकल्प - ०.२१
--------------------------------------
पाण्याखाली बंधारे
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, चिंचोली, हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व चिखली, साळगांव, कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी व कोवाड, दत्तवाड, बीड असे २८ बंधारे पाण्याखाली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT