CM Eknath Shinde esakal
कोल्हापूर

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री धावता कोल्हापूर दौरा, ‘विशाळगड’ची घेतली माहिती?

Vishalgad Encrochment: आषाढी वारीतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूरला गेले होते.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १४: अतिक्रमणावरून रविवारी विशाळगड प्रकरण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथील विमानतळावर मध्यरात्री अचानक दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून घटनाक्रमाची तसेच तेथील न्यायालयीन प्रकरणांची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.

cm eknath shinde visits kolhapur airport in midnight take information about vishalgad encrochment issue

आषाढी वारीतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूरला गेले होते. तेथील पाहणीनंतर हवामानामुळे त्यांनी अचानक कोल्हापूरला येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे व कृषी मंत्री दादा भुसे मोटारीने कोल्हापूर विमानतळावर येण्यास निघाले. दोघेही मध्यरात्री एकच्या दरम्यान येथील विमानतळावर पोहोचले.

त्यावेळी त्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी विशाळगडवरील घटनांची माहिती दिली. तेथील काही न्यायालयीन प्रकरणांचीही माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्याचे समजते. त्यानंतर ते विमानाने मुंबईला रवाना झाले.

मुख्यमंत्री अवघी वीस मिनिटे विमानतळावर होते. यावेळी वीरेंद्र मंडलिक व शिवसैनिक उपस्थित होते. त्यांच्या दौऱ्यात झालेल्या अचानक बदलामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. सोमवारपासून अतिक्रमणे काढली जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रात्रीच्या धावत्या दौऱ्यात या कारवाईच्या संदर्भाने सूचना दिल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT