kolhapur rain esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Updates: पालकमंत्री साहेब, शहरातून फेरफटका माराच...कोल्हापूरचं झालं डबकं, नागरिकांचा टाहो

Kolhapur News: जीवघेणे खड्डे बुजवलेच नाहीत : पाणी साचून राहिल्याने अपघातांचे प्रमाण वाढले

CD

कोल्हापूर, ता. १९ : कोल्हापूरचं डबकं झालं आहे... खड्डे तर कोल्हापूरकरांच्या पाचवीलाच पुजल्याची स्थिती आहे. शहरात ठिकठिकाणी खड्ड्यात पाणी साचून राहिल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. अमृत योजनेच्या पाईप लाईनसाठी खोदाई झाली, मात्र मुरूम टाकून बुजविणे शक्य झाले नाही. परिणामी प्रवासी, नागरिकांच्या माथी अडथळे मारून ठेवले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्याला केराची टोपली मिळाल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना खड्ड्यातून, डबक्यातूनच पुढे जावे लागत आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाकडून याची दखल घेतली जाणार काय? असाही सवाल उपस्थित होत आहे.

शिवाजी उद्यमनगर ते वाय. पी. पोवार नगरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अमृत योजनेची खोदाई झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक होत नाही. त्याच्या उलट दिशेला खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणे म्हणजे डबक्यातूनच जावे लागते. शिवाजी उद्यमनगर चौकात गेली पाच वर्षे असलेला खड्डा अद्याप बुजवलेला नाही.

रेड्याची टक्कर, शास्त्रीनगर मार्गावर सुद्धा खड्डेच खड्डे आहेत. रंकाळा टॉवर चौकातील जावळाचा गणपती, बिंदू चौक, सीपीआर चौक, मंडलिक वसाहत, बालकल्याण संकुल समोरील नंगीवली चौक परिसर ते रेसकोर्स नाका, बिनखांबी गणेश मंदिर निवृत्ती चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, सायबर चौक, खरे मंगल कार्यालय, राजारामपुरी पोलिस ठाणे, शिवाजी उद्यमनगर चौक ते माऊली चौक, बागल चौक ते बी. टी, कॉलेज, मंडलिक वसाहत ते सावंत कोचिंग क्लासेस, हॉकी स्टेडियम खाऊ गल्लीजवळ, साई मंदिर कळंबा रिंग रोड, परीख पूल या ठिकाणचे खड्डे अद्याप बुजविलेले नाहीत.

हतबल नागरिकांकडून तुटपुंजे उपाय

पालकमंत्र्यांच्या आदेशाला कोण विचारते की नाही, अशी स्थिती आज शहरात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविणे आवश्‍यक होते. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता अनेक खड्ड्यांत पाणी साठून अपघात होत असल्यामुळे स्थानिक नागरिक खड्ड्यात रोपटे लावत आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांच्या भोवती दगड ठेवले जात आहेत.

तरच समजतील हाल...

मार्केट यार्ड मार्गावरील रेल्वे गुडस यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पालकमंत्री आणि महापालिका अधिकारी दुचाकीवरून जावे म्हणजे त्यांना नागरिकांना प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची त्यांना जाणीव होईल. शहरातील नागरिक त्रास सहन करतात याचा गैरफायदा प्रशासनाकडून आणि नेत्यांकडून घेतला जात आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची त्यांना थोडीही कदर नसल्याची जाणीव आज शहरातील रस्त्यांवरून फिरताना जाणवते. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे मॅनहोलसुद्धा डोकेदुखी आहेत, अशा प्रतिक्रियाही आता उमटू लागल्या आहेत.

रस्त्यावरील जीवघेणे खड्डे

बिनखांबी गणेश मंदिर ते निवृत्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चेंबरजवळ पडलेला खड्डा जीवघेणा बनला आहे. नागरिकांनी तक्रार करूनही महापालिकेने केवळ बॅरिकेड लावून उपाययोजना केली आहे. वर्दळीच्या असलेल्या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे.

या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या ड्रेनेज चेंबरच्या बाजूलाच जवळपास पंधरा दिवसांपूर्वी खड्डा पडला. चेंबरच्या बाजूचा भाग पोकळ झाल्याने हा खड्डा खोल झाला. त्यात दुचाकीचे चाक जाऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तक्रार केल्या. त्यानंतर त्या खड्ड्यात दगड, मुरुम टाकून तो बुजवण्याचा प्रयत्न केला. पण खड्डा पुन्हा पडला.

त्यावेळी बॅरिकेड लावून त्यातून वाहने जाऊ नयेत याची दक्षता घेण्यात आली. त्यालाही बरेच दिवस झाले तरी त्यानंतर पुढे काही केलेले नाही. रस्त्याच्या मध्यभागी असलेले ते बॅरिकेड रात्री दिसत नाही. या रस्त्यावर मोठी वर्दळ आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT