शिरगुप्पी, ता. ५ : कागवाड तालुक्यातील जुगुळ, मंगावती, शहापूर या कृष्णा काठावरील तीनही पूरबाधित गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.
CM Siddaramaiah Announces Rehabilitation Plan for Flood-Hit Villages Near Maharashtra Border
जुगुळ येथील कृष्णा नदीच्या पूरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांच्या सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘गेल्या १९ वर्षांत येथे पाचवेळा पूर आला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या तीन गावांतील तीन हजार घरांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून शेतीचे सर्वेक्षण करून त्यांनाही नुकसानभरपाई देऊ, स्थलांतर झाल्यास पक्की घरे बांधण्यासाठीही निधी देण्यात येईल.’ आमदार राजू कागे म्हणाले, ‘या तीनही गावांना पुराचा मोठा फटका बसत असल्याने कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावे. शेती नुकसानीची भरपाई देण्यात यावी.’
दरम्यान, गोकाक येथे पूरपरिस्थितीची पाहणीही करून निवारा केंद्रातील पूरग्रस्तांची भेटही त्यांनी घेतली. तसेच मांजरी (ता. चिक्कोडी) येथील पुलावरून कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याची माहिती घेतली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कोयना व इतर जलाशयतील विसर्ग आणि आलमट्टी जलाशयातून पुढे सोडण्यात येत असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.