कोल्हापूर

रेणूका भक्त संघटनेतर्फे निवेदन

CD

06463
कोल्हापूर : जिल्हा रेणुका भक्त संघटनेतर्फे जुना राजवाडा ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
...
चौथ्या श्रावण सोमवारी
पोलिस बंदोबस्त द्यावा
जिल्हा रेणुका भक्त संघटना ः पालखी, मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : श्रावण मासातील चौथ्या सोमवारी (ता. २६) पोलिस बंदोबस्त द्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा रेणुका भक्त संघटनेतर्फे जुना राजवाडा ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, प्रथेप्रमाणे श्रावण मासातील चौथ्या सोमवारी पंचगंगा नदी घाटावर शहरातील मानाच्या रेणुका देवीच्या चारही जगाकडून त्यांच्या पद्धतीनुसार धार्मिक विधी आणि पालखी सोहळ्याचे कार्यक्रम होतात. यावर्षीसुद्धा सोमवारी (ता. २६) दोन वाजता हा विधी होणार आहे. पूजेचा विधी झाल्यानंतर मिरवणुकीने पालखी आणि जग पंचगंगा रुग्णालयामार्गे शहरात येतात. या मिरवणुकीत जोग, जोगतीण आणि तृतीयपंथी समाज मोठ्या संख्येने सामील होतो. त्यांच्या नृत्याच्या प्रकाराला तेथील तरुण साथ देतात. नृत्याच्या मर्यादाही ओलांडल्या जातात. असह्य हिडीस नृत्याचा प्रकार २०२२ च्या मिरवणुकीत घडला होता. यंदा खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेतर्फे आयोजित या मिरवणुकीस पोलिस बंदोबस्त द्यावा. दुपारी दोन वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत पुरेसा पोलिस बंदोबस्त पुरवल्यास देवीची पालखी आणि जगाची मिरवणूक धार्मिक वातावरणात पार पडेल.
निवेदन देताना अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष सरदार जाधव, संस्थापक सदस्य अच्युत साळोखे,
सरचिटणीस दयानंद घबाडे, शालिनी सरनाईक, लता सोमवंशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT