amit shah devendra fadnvis esakal
कोल्हापूर

Amit Shah Kolhapur: देवेंद्र यांचे रक्षण मी करतो! अमित शहा यांनी दंड थोपटला, कोल्हापुरात कार्यकर्त्यांना दिला खास कानमंत्र

Amit Shah shares secret to win maharashtra vidhansabha: " शरद पवार आणि त्यांच्या घटक पक्षांचे बूथ पातळीवरील कार्यकर्ते फोडा" केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या घटक पक्षांचे बूथ पातळीवरील कार्यकर्ते फोडा. त्यांना आपल्या पक्षात घ्या. त्यांचा बूथ रिकामा झाला की त्यांची ताकद संपणार आहे. त्यामुळे श्री. पवार आणि त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे केले. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार रावसाहेब दानवे, राष्ट्रीय सरचिटणीस शिवकुमार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले.

यावेळी श्री. शहा म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून तुम्ही नाराज आहात. काँग्रेसला तीन निवडणुकीत मिळून जेवढ्या जागा मिळाल्या नाहीत, तेवढ्या आपल्याला केवळ २०२४ च्या निवडणुकीत मिळाल्या आहेत. देशातील आपल्या मतांचा टक्का वाढला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी कशाचा अहंकार बाळगत आहेत? भाजप असा पक्ष आहे, ज्याने अनेक जय- पराजय पाहिले आहेत. आम्ही दोन खासदारांवरून ३०० पर्यंतचा टप्पा गाठला आहे.’’

ते म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांत या देशात जे कधीच घडणार नाही, असे वाटत होते ते आपण करून दाखवले आहे. नक्षलवाद संपवला. दहशतवाद गाडला. नागरिकत्व सुधारणा कायदा केला. तिहेरी तलाख संपवला. देशाची अर्थव्यस्था जगातील पाचव्या क्रमांकावर नेली. जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द केले. अयोध्येत राम मंदिर बांधले. भाजप कार्यकर्ते मंत्री होण्यासाठी काम करत नाहीत, तर देशाला परम वैभवाला नेण्यासाठी काम करतात.’’ खासदार धनंजय महाडिक यांनी आभार मानले.

‘‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही केवळ राज्याची नाही, तर या निवडणुकीतील विजयाने संपूर्ण देशात उत्साह संचारणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जोशात नव्हे, तर सूक्ष्म नियोजन करून गांभीर्याने लढवा.’’
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

शहांचा कानमंत्र

- मंडल अध्यक्ष, प्रभारी यांची बैठक घ्या
- बूथचे ए, बी, सी यामध्ये वर्गीकरण करा
- शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना शासनाच्या योजनांची प्रत द्या
- प्रत्येक बूथमध्ये ११ दुचाकीवरून भाजपचे झेंडे घेऊन अकरा दिवस रॅली काढा
- विरोधी पक्षांचे कार्यकर्ते फोडा
- योजनांच्या लाभार्थींच्या घरी चहासाठी आवर्जून जा
- मंदिरे, मठ येथील संतांचे सत्कार करून भाजपसाठी आशीर्वाद घ्या
- प्रत्येक बूथवर महायुतीसाठी दहा टक्के मते वाढवा

अरे, उनको क्या मिलेगा!

अमित शहा यांनी अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांना पक्षात घ्या, असे म्हटल्यावर सभागृहात शांतता पसरली. त्यावेळी शहा म्हणाले, ‘‘इथे दहा वर्षे पक्षाचे काम करणारे किती कार्यकर्ते आहेत. त्यावर कार्यकर्त्यांनी हात उंचावले. त्यांना शहा म्हणाले, ‘‘अरे, उनको क्या मिलेगा! इथे तुम्हाला काही मिळाले नाही तर त्यांना काय मिळणार आहे? काळजी करू नका. हा पक्ष मागणाऱ्याला काही देत नाही, तर न मागणाऱ्याला बोलवून देतो.’’

देवेंद्र यांचे रक्षण मी करतो!


अमित शहा यांनी पोलिसांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. देवेंद्र फडणवीसांचे रक्षण मी करतो.’’ यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SA vs IND: मार्करमने जिंकला टॉस! T20I वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा भारत-दक्षिण आफ्रिका आमने-सामने

Cannabis Farm in Dhule: धुळ्यात सव्वा दोन एकरात गांजाची लागवड, सहा कोटींचा माल... भयानक शेती पाहून पोलीसही चक्रावले

Pune Crime : मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT