कोल्हापूर

अमल महाडिक मुलाखत

CD

विद्यमान आमदारांचा विकास
फलकावरच ः अमल महाडिक

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला. पण, त्यानंतर लगेच मी कामाला सुरूवात केली. गावांना भेटी दिल्या, लोकांचे प्रश्‍न ऐकून घेतले. त्यानंतर नागरिकांचे विविध विषय घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यालट विद्यमान आमदारांचा विकास फक्त फलकावरच दिसत आहे, अशी टीका कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी केली.
-ओंकार धर्माधिकारी

प्रश्न ः कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आपण कोणते मुद्दे घेऊन उतरला आहात?
उत्तर ः दक्षिण विधानसभा मतदारसंघात ग्रामीण, शहरी असे दोन्ही भाग येतात. याशिवाय ग्रामपंचायत क्षेत्रातील उपनगरेही आहेत. त्यांचे काही मूलभूत प्रश्व आहेत; मात्र गेल्या पाच वर्षांत विद्यमान आमदारांनी त्यांची सोडवणूक केली नाही. त्यांचा मतदारसंघात संपर्कही नाही. पर्यायाने दक्षिणचा विकास खऱ्या अर्थाने ‘क्षीण’ झाला आहे. त्यामुळे आता लोकांना परिवर्तन हवे आहे. त्यांनी विकासकामांचे फलक लावले. मात्र, ती कामे केवळ फलकावरच राहिली आहेत, हाच आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे.

प्रश्न ः अमल महाडिक यांनी संपर्क ठेवलेला नाही, अशी टीका होत आहे?
उत्तर ः माझा २०१९ मध्ये पराभव झाला. त्यानंतर लगेचच कामाला सुरूवात केली. गावागावांत नियमित भेटी दिल्या. लोकांचे प्रश्न सोडवले. शहरी भागात दोन हजारांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले. खासदार आणि मंत्र्यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत आमदार नसतानाही मी २०० कोटी रुपयांची विकासकामे केली. दक्षिण विधानसभा क्षेत्रामध्ये स्वखर्चातून आयुष्यमान भारतचे कार्ड ४० हजार लोकांना मिळवून दिले. मी काम केले; पण त्याचा गाजावाजा केला नाही. कारण विरोधकांसाठी राजकारण हा व्यवसाय आहे. माझ्यासाठी तो समाजसेवेचा वारसा आहे.

प्रश्न ः खासदार धनंजय महाडिक यांचे विधान प्रचारात अडचणीचे ठरेल का?
उत्तर ः लाडकी बहिण योजना ही महिलांना सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने बनवली. जिल्ह्यात महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे महिलांचा महायुतीला पाठींबा आहे. खासदार महाडिक यांच्या वाक्याचा विरोधकांनी विपर्यास केला आहे. जनतेच्याही हे लक्षात आले आहे. मतदारसंघात ३० हजार महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. या योजनेमुळे महायुतीला प्रतिसाद वाढत आहे.

प्रश्न ः महायुतीच्या काळात विरोधी आमदार म्हणून निधी नाही असे ऋतुराज पाटील म्हणतात, त्याबद्दल काय सांगाल?
उत्तर ः काँग्रेसने मतदारसंघात काही केले नाही हे त्यांनीच कबूल केले आहे. ते म्हणतात पहिली अडीच वर्षे कोरोनामुळे काही करता आले नाही आणि नंतरची अडीच वर्षे महायुती सरकारने निधी दिली नाही. त्यामुळे कामे झाली नाहीत. एका अर्थाने ५ वर्षात आम्ही काही केले नाही असेच ते कबूल करतात. दक्षिणधील गावांतील आणि शहरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, पाणी प्रश्न हे सगळे तसेच आहे. करायचे काही नाही आणि रेटून सांगायचे ही विरोधकांची कार्यपद्धती आहे.

प्रश्न ः मतदारसंघाच्या विकासासाठी आपले धोरण काय असेल?
उत्तर ः हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण मतदारांचा आहे. येथील समस्यांमध्येही वैविध्य आहे. विकासाचे धोरण आखताना प्रत्येक परिसराचा विचार करून आराखडा बनवला पाहिजे. १३ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत नाही. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय ठेऊन काम करावे लागेल. राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करायला हवा. प्राधिकरण सक्षम करण्याबरोबर उपनगरांच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. रस्ते, स्वच्छता, पाणी हे मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे माझा कल असेल.

प्रश्न ः तरुणांच्या हाताला रोजगारासाठी काय करणार?
उत्तर ः रोजगाराच्या संधीचा विचार करताना बाजारपेठ, कौशल्य विकास, औद्योगिक संधी यांचा विचार केला पाहिजे. यासाठी पहिल्यांदा औद्योगिक सर्वेक्षण करून स्थानिक उद्योगांना कशा प्रकारचे मनुष्यबळ लागणार आहे याची माहिती घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांना आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी केंद्र सुरू केले पाहिजे. तसेच उद्योग आणि तरुण यांच्यात समन्वय ठेवणारी व्यवस्था उभी करायला पाहिजे. त्यातून स्थानिक उद्योगांना लागणारे मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल. त्याचबरोबर कृषीपूरक उद्योगांना प्राधान्य देऊन तरुणांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठीही पुढाकार घेऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT