कोल्हापूर

बदलती जीवनशैली अन हाडांची ठिसुळता ः मालिका भाग दुसरा

CD

बदलती जीवनशैली अन्‌ हाडांची ठिसुळता ः भाग २


(पाठीच्या कणाचा संग्रहीत फोटो वापरावा…)

डोकेदुखीनंतर पाठदुखीचा त्रास सर्वाधिक
दुर्लक्षामुळे दुखणे वाढते, अपुऱ्या झोपेने पाठदुखी बळावते

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. ८ :  बहुतेक व्यक्तींना आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर पाठदुखीला सामोरे जावे लागते. पाठदुखीसाठी ‘ऑस्टिओपोरोसिस’ हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डोकेदुखीनंतर पाठदुखी ही सर्वाधिक असणारी समस्या आहे; मात्र याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ही पाठदुखी वाढून हालचाली मंदावण्याची शक्यता असते.   


पाठदुखीचे प्रकार 

‘ऑस्टिओपोरोसिस’  
हाडांची झीज, हाडे बारीक किंवा ठिसूळ होणे, हार्मोन्स बदलामुळे ऑस्टिओपोरोसिस ही समस्या उद्भवते. विशेषतः महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे प्रमाण वाढते. ऑस्टिओपोरोसिस संबंध वयाशीही असतो. आतड्यांकडून कॅल्शिअम अपुऱ्या प्रमाणात शोषले जाणे आणि ‘ड’ जीवनसत्त्व अपुऱ्या प्रमाणात मिळणे, यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतो. क्ष–किरण चाचणी, हाडांच्या घनतेची आणि रक्ततपासणी करून ऑस्टिओपोरोसिसचे निदान करता येते. ‘ड’ जीवनसत्त्व हा ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध करणारा घटक आहे. 

हर्निएटेड डिस्क:
तुमच्या पाठीवर अचानक ताण येऊ शकतो. हा ताण काही रोजच्या व्यायामाने बरा होऊ शकतो. जड वजन उचलणे, हे अचानक ताण येण्याचे कारण आहे.

स्पाईनल स्टेनोसिस:
जेव्हा मणक्यातील मोकळी जागा खूप अरुंद होते आणि पाठीच्या कण्यावर थोडासा दबाव येऊ शकतो तेव्हा हे घडते. ५० वर्षांवरील वयोगटांना या समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

स्कोलियोसिस:
मुलींना मुलांपेक्षा या पाठदुखीचे प्रमाण अधिक आहे. निरोगी मणक्याच्या मज्जातंतूमध्ये नेहमी समोरून पाठीमागे वक्र असतो, परंतु स्कोलियोसिस असलेल्या लोकांना कडेकडेने पाठीचा कणा असतो ज्यामुळे वजन वाढू शकते किंवा ताण वाढू शकतो. हा आजार लहान वयातच त्रास देऊ शकतो.

ड जीवनसत्त्व 
९० टक्के भारतीयांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे काही वैद्यकीय अहवालानुसार समोर आले. सूर्यकिरण तुमच्या त्वचेला थेट स्पर्श करतात तेव्हाच तुमचे शरीर ‘ड’ जीवनसत्त्वाची निर्मिती करते. घरात बसून तुमचे शरीर ‘ड’ जीवनसत्त्व तयार करू शकत नाही हेही समजून घ्यावे. शारीरिक हालचाल कमी असणे अथवा नसणे, हेही ऑस्टिओपोरोसिस होण्यासाठी कारणीभूत असते. चालणे, सायकलिंग, योगासने, नृत्य, हलका व्यायाम, तसेच आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, फळे, सुका मेवादेखील ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास
फायदेशीर ठरते.

घरगुती उपाय 
तणावग्रस्त स्नायूंना हळूवारपणे मालिश करणे. समतल जमिनीवर चालणे, जमेल तितके वाकणे असे व्यायाम. असुविधाजनक गादी, चुकीच्या आकाराच्या उशा किंवा पुरेशी झोप न मिळाल्याने पाठदुखी होऊ शकते. रात्री ७ ते ९ तासांची झोप आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT