कोल्हापूर

पोलिसांच्या बदल्या सुधारित

CD

परिक्षेत्रातील ४० सहाय्यक
पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

५५ पोलिस उपनिरीक्षकांच्याही बदल्या

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : कोल्हापूर परिक्षेत्रातील ४० सहाय्यक पोलिस निरीक्षक तर ५५ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आज प्रसिद्ध झाले. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हे आदेश प्रसिद्ध केले आहेत.
सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये एकूण दहा जणांना मुदतवाढ दिली आहे. नऊ जणांनी केलेली विनंती बदली अमान्य केली असून, आठ जणांची विनंती बदली मान्य केली आहे. तसेच १० जणांना पुन्हा आहे त्या ठिकाणी मुदत वाढ दिली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील १७ उपनिरीक्षकांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या केल्या आहेत. नोकरीचा विहित कालावधी पूर्ण झाल्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातून आज या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये ज्यांचा विहित कालावधी पूर्ण झाला आहे त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उपनिरीक्षकांमध्ये ५५ जणांचे आदेश झाले असून, यामध्ये नऊ विनंती बदल्या अमान्य केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर दोन, सांगली तीन, सोलापूर ग्रामीण तीन आणि सातारा जिल्ह्यातील एका उपनिरीक्षकांचा समावेश आहे. कोल्हापुरात चार उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून एकूण ५५ बदल्यांमध्ये १३ जणांना आहे त्या ठिकाणी मुदत वाढ दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT