कोल्हापूर

ऊस दर आंदोलन

CD

03899
दानवाडः येथे उसाचे ट्रॅक्टर अडवण्यावरून कार्यकर्ते आणि कारखाना समर्थकात सुरू असलेला वाद.
...
दानवाड, घोसरवाडमध्ये ऊस वाहतूक रोखली

कारखाना समर्थक -कार्यकर्त्यांच्यात झटापट

कुरुंदवाड, ता.३ः कर्नाटकातून दानवाड आणि घोसरवाड (ता.शिरोळ) येथे आलेले उसाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरले. यावेळी कारखानदार समर्थक आणि कार्यकर्त्यांच्यात झटापट व बाचाबाची झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे ट्रॅक्टर कारखान्याकडे रवाना केले.
मागील हंगामातील चारशे रुपये व पुढील हंगामातील दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत आणि शेतकऱ्यांनी ऊस तोड घेऊ नये, असे आवाहन संघटनांनी केले आहे. मात्र कारखाने सुरू झाले असून कारखानदारांनी कर्नाटकातून ऊस आणण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही घेतला आहे. आज दानवड आणि टाकळीवाडी येथे संघर्ष सुरू झाला. निर्णय झाल्याशिवाय ऊसतोड करू नये, असा दोन्ही संघटनांनी इशारा दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा आज इस्लामपूर येथून सुरू झाली असतानाच शिरोळ तालुक्यातील कारखान्यांनी कर्नाटकातील ऊसतोडी सुरू करून सात ट्रॅक्टर व ट्रकमधून दानवाडमार्गे ऊस महाराष्ट्रात आणला. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रकच्या आडवे झोपत रोखून धरले. काही वेळातच त्या ठिकाणी कारखाना समर्थकांनी मोठी गर्दी केली. कार्यकर्ते आणि समर्थकांच्यात जोरदार वादावादी झाली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ हा प्रकार सुरू होता. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.पोलिसांनी हस्तक्षेप करत आडवे झोपलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करत वाहने कारखान्याच्या दिशेने रवाना केली.
कर्नाटक राज्यातील सदलगा येथून घोसरवाड-दत्तवाडमार्गे उसाचे ट्रॅक्टर येत असल्याची माहिती संघटना व आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना मिळताच टाकळीवाडी हद्दीत हे ट्रॅक्टर अडवून टायर फोडून रोखून धरले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत केले. रात्री उशिरा कारखाना समर्थकांनी ट्रॅक्टर दुरुस्त करून कारखान्याकडे घेऊन गेले.
...

हेमरस कारखान्याला स्वाभिमानीचे निवेदन
कोवाड ः चालू गळीत हंगामातील ऊसदर व मागील गळीत हंगामातील ऊसाला प्रतिटन ४०० रुपये द्यावेत तसेच ऊस वजन काटे डिजीटल करावेत,या प्रमुख मागण्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन सुरु ठेवले आहे. तरीही या आंदोलनाकडे दुर्लक्ष करुन ओलम (हेमरस) शुगर्सने कर्नाटकातील ऊस आणून कारखाना सुरु करण्याचा सुरु असलेला प्रयत्न तत्काळ थांबवावा, अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ओलम (हेमरस) कारखान्याकडे करण्यात आली. संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्याण्णावर ,जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राजगोळी ते कारखान्यापर्यंत चालत जाऊन निवेदन दिले. निवेदन स्वीकारुन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT