कोल्हापूर

सेवा रुग्णालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उपक्रम

CD

01074
लोकसंख्या दिनानिमित्त
सेवा रुग्णालयात उपक्रम
कसबा बावडा : ता. ११ ः सेवा रुग्णालयात आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उपक्रम राबवण्यात आला. लोकसंख्या दिनाची केंद्र सरकारने यंदाची थीम माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी दोन आपत्यात योग्य अंतर ठेवा अशी आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलिमा पाटील उपस्थित होत्या.
डॉ. देशमुख म्हणाल्या, ‘‘जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती व्हावी. माता आणि बालकांचे आरोग्य चांगले राहावे; हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी योग्य कुटुंबनियोजन आवश्यक असून यासंबंधी माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.’’ डॉ. मीना बारवाडे म्हणाल्या, ‘‘लोकसंख्या नियंत्रणासाठी दोन अपत्यांतील अंतर पाच वर्षे असावे. कुटुंबाचा आर्थिक स्तर लक्षात घेऊन कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे.’’ दरम्यान, सेवा रुग्णालयात तीन टप्प्यांत हा उपक्रम राबवण्यात आला. पहिल्या टप्प्यात सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. दुसऱ्या टप्प्यात दाम्पत्य संपर्क पंधरवडा, कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे महत्व पटवून देत जनजागृती करण्यात आली. तसेच तिसऱ्या टप्प्यात कुटुंब नियोजन सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यावेळी डॉ. नीलिमा पाटील यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. अजय शिंदे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. डॉ. प्रवीण नाईक यांनी आभार मानले. जयश्री रणवरे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT