कोल्हापूर

आंबर्डे (ता . शाहूवाडी ) धरण पाणीपूजन सोहळा

CD

01915

विकासाचे राजकारण करावे
डॉ. विनय कोरे; आंबर्डे धरणाच्या पाणीपूजन सोहळा

शाहूवाडी, ता. ७ : आपणच कामे केल्याचा खोटा प्रचार करून माजी आमदार जनतेची दिशाभूल करत आहेत. जनतेला पाण्यासारख्या मूलभूत सुविधापासून वंचित ठेवण्याचे पाप त्यांनी केले आहे. विकासाचे राजकारण त्यांनी करावे, अशी टीका आमदार डॉ. विनय कोरे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांचे नाव न घेता केली.
आंबर्डेत धरणाच्या पाणीपूजनाचा सोहळ्यावेळी ते बोलत होते. गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड व जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील प्रमुख उपस्थित होते. ते म्हणाले, ‘आंबर्डे धरणामुळे परिसरातील गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. धरणासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचे याकामी मोठे योगदान आहे.’ सर्जेराव पाटील म्हणाले, ‘धरणाचे काम भक्कम झाले आहे. मात्र विरोधक अफवा पसरवत आहेत. जनतेने विश्वास ठेवू नये.’ यावेळी माजी सरपंच सूर्यकांत पाटील, माजी सभापती सुभाष इनामदार, माजी उपसभापती महादेव पाटील, पंडित नलवडे, रंगराव खोपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. धरणासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, अमर खोत, बाळासाहेब गद्रे, ज्ञानदेव वरेकर, सुरेश भोगटे, किशोर साणगर, दीपक जाधव उपस्थित होते. दरम्यान चनवाड श्री हनुमान मंदिराचे पायापूजन व शाहूवाडीतील नळपाणी योजनेचे भूमिपूजन आमदार कोरे यांच्या हस्ते झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT