कोल्हापूर

लाथाबुक्यांनी मारहाण,दहा जणांवर गुन्हा.

CD

जागेच्या कारणावरुन मारहाण; दहा जणांवर गुन्हा
मुरगूड,ता.१० : मळगे बुद्रुक (ता.कागल) येथे जागेच्या कारणावरुन घरातून ओढून काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मोटारसायकलचे नुकसान केल्याची तक्रार सदाशिव तिमान्ना वडर यांनी मुरगूड पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलिसांत मळगे बु.आणि अक्कोळ (ता. चिक्कोडी) येथील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मळगे बुद्रुक (ता.कागल) येथे संशयित व फिर्यादी सदाशिव तिमान्ना वडर यांच्यात जागेच्या कारणावरुन वाद आहे. या कारणावरुन रविवारी सकाळी संशयीत अशोक तिमन्ना वडर, संतोष तिमन्ना वडर, राणी अशोक वडर, विजय गणपती वडर, रेखा गणपती वडर, शेवंता दगडु वडर, मारुती दगडु वडर सर्व रा. मळगे बु तसेच अतुल दिलीप वडर, अशिष दिलीप वडर, वंदना दिलीप वडर (तिघेही रा.कोळ ता.चिक्कोडी) यांनी जमाव करुन सदाशिव वडर यास घरात घुसैन बाहेर ओढुन नेले व मारुती वडर याने धरले तर अतुल दिलीप वडर, अशिष दिलीप वडर, वंदना दिलीप वडर व राणी अशोक वडर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारुती वडर याने दुचाकी (एमएच ०९ एफयू १८४८ ) ची डिक्की तोडून नुकसान केले. यावेळी विजय वडर याने सदाशिव वडर याच्या सूनेस शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद सदाशिव वडर यांनी मुरगूड पोलिसांत दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT