कोल्हापूर

नागावात पाणी टंचाई ; उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच टँकरद्वारे पाणी

CD

03113
नागावात उन्हाळ्यापूर्वीच टॅंकरने पाणी
नागरिकांची वणवण ः विहिरींनी गाठला तळ
सकाळ वृत्तसेवा

नागाव, ता. २४ : मुबलक पाणी असणाऱ्या नागावला उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. व्यवस्थापनाचा भाग म्हणून सुरवातीपासूनच एक दिवस आड पाणीपुरवठा होतो. आता आठवड्यातून दोनच वेळा पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्यांनी टँकरद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
ग्रामपंचायतीकडे स्वतःचा जलस्रोत नसल्याने ग्रामस्थांची तहान विकास संस्थेच्या कृषी पाणीपुरवठा योजनेतून भागवली जाते. कृषी योजनांना उपसाबंदी असल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गावात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. ही योजना चार विहिरींवर अवलंबून आहे. गावभागातील श्री खणाई देवी मंदिराशेजारी आणि जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेजवळ असणाऱ्या दोन विहिरींना स्वतःचा जलस्रोत आहे. पण या दोन विहिरींवर गावाची तहान भागणार नाही. शिवाय पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत चौगुले मळा, शिवनेरी कॉलनी, इंदिरानगर, छत्रपती संभाजीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, खणाईनगर, वाल्मिकीनगर आणि नागाव फाटा या वाढीव वसाहतींना दोन स्वतंत्र विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही विहिरींना स्वतःचा जलस्रोत नाही. त्यामुळे सभोवतालच्या शेतात पाजलेले पाणी पाझर पध्दतीने या विहिरीत येते. सध्या या विहिरीत नागाव विकास संस्थेच्या कृषी पाणीपुरवठा योजनेतून थेट पाणी सोडले जाते. पण पाटबंधारे विभागाने उपसा बंदी आदेश लागू केल्याने विहिरीतच पाणी नाही. अशा परिस्थितीत नळाला पाणी कोठून येणार? वाढीव वसाहतीमधील रहिवासी नोकरदारवर्ग आहे. तेथील महिलाही औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जातात. अनेकांची पाणी विकत घेण्याची ऐपतही नाही. त्यामुळे दूरच्या कूपनलिका, तळ गाठलेल्या विहिरी यांचा आधार घेत मोठी कसरत करत पाणी टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कोट
ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी देत आहे. गावची लोकसंख्या विचारात घेता गावासाठी मोठ्या जलस्त्रोताची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन मिशन जलजीवनअंतर्गत मंजूर निधीतून तत्काळ काम होणे गरजेचे आहे.
- अमित खांडेकर; ग्रामपंचायत सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT