अभिजित कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. ३ : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्याा सहापदरीकरणामध्ये कोल्हापूर शहराला जोडणारा ब्रिटीशकालीन पुल आता नामशेष झाला आहे. पण अखेरचा श्वास घेतानाही या पुलाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुमारे पंचाहत्तर लाख रुपये मिळवून दिले. अ
त्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित कटरच्या सहाय्याने हा लोखंडी पूल नष्ट करण्यात आला. या पुलातून सुमारे दोनशे दहा टन लोखंड निघाले. ज्याची स्क्रॅप बाजारभावाने रुपये सत्तर लाख एवढी किंमत होते. हा पुल उतरवण्यासाठी सुमारे अडीच महिन्याचा कालावधी लागला. मासिक सात लाख रुपये भाड्याने क्रेन, गॅस कटरसाठी लागणारा गॅस आणि वीस मजुरांची पंच्याहत्तर दिवसांची मजूरी असा पुल उतरविण्यासाठी सुमारे पंचवीस लाखाचा खर्च आला आहे.
येणाऱ्या काही दिवसांत खरच असा पुल तिथे होता का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण दीडशे वर्षांपूर्वी उभारलेल्या या पुलाच्या दगडी पिलरचे बांधकाम, त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य याचा विचार करता या पुलाचे असे काय वेगळेपण होते, ज्यामुळे महापुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहातही या दगडी पिलरचा एकही दगड हलला नाही. याचा आभ्यास होणे गरजेचे होते. लोखंडी गर्डर्स, लोखंडी प्लेट्स ते जोडण्यासाठी वापरलेले रिबेट थोडेही गंजलेले नव्हते. आणि म्हणूनच कदाचित हा पुल उभारण्यासाठी झालेल्या खर्चापेक्षा जास्तीची रक्कम हा पुल उतरवण्यासाठी खर्च झाली आहे.
अठराशे सत्तरच्या दशकात ब्रिटिश बटालियनच्या एका तुकडीला कोल्हापूर संस्थानात महत्वाकांक्षी प्रकल्प उभारायचे होते. याकरता वस्तू, माल आणि यंत्रसामग्री यांची नदी पात्रावरील वाहतूक सोयीची व्हावी यासाठी पंचगंगा नदीवर एक पुल असणे ही तत्कालीन गरज होती. यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नदी पात्राची पाहणी करून योग्य जागेची निवड केली होती.
या पूलाच्या उत्तरेकडील एका पिलरचा पाया खोदताना अपेक्षित जमिनीचा स्थर मिळत नव्हता. त्यामुळे तेथील मातीचे सॅँपल तपासणीसाठी इंग्लंडला पाठविण्यात आले होते. त्यानंतर ब्रिटिश अभियंत्यांनी फेररचना करत पिलरची साईज बदलली आणि पिलवर दगडी कमाणीऐवजी लोखंडी फ्रेमचे स्ट्रक्चर समाविष्ट केले.
दिडशे वर्षाचा साक्षीदार
लंडनमधील वेस्टवुड बॅली अॅण्ड कंपनीला याचे काम दिले होते. त्याप्रमाणे सर्व लोखंडी गर्डर्स, लोखंडी प्लेटस्सह इतर साहित्य इंग्लंड वरून आणले. मोठ्या रिबेटचा वापर करून हा पूल जोडण्यात आला. १८७३ साली या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. २०२३ मध्ये या पुलाला दीडशे वर्षे पुर्ण झाली. आणि दिडशे वर्षाचा साक्षीदार आता नामशेष झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.