कोल्हापूर

जोतिबा डोंगराला विदेशी वनस्पतींचा विळखा मालिका भाग २

CD

22421
गिरोली (ता. पन्हाळा) घाटातील बेसुमार वाढलेली विदेशी झाडे.

जोतिबा डोंगराला विदेशी वनस्पतींचा विळखाः भाग २

देशी वृक्षांची लागवड, थांबेल पशू-पक्ष्याची परवड
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. ९ : पशुपक्षी हे वनसंपत्तीचे मोठे वैभव आहे . या प्राण्यांना भारतीय उपखंडाबाहेरील विदेशी वनस्पती अनोळखी आहेत. त्यामुळे ते त्यांच्याकडे आकर्षित होत नाहीत. त्यासाठी खास करून वड, आंबा, पिंपळ, चिंच, जांभूळ, कडुनिंब, आवळा, हिरडा, अर्जुन, करंज, फणस, काटेरी बाभूळ, काटेरी शिवर, पांढरा शिरीष अशा वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. ही झाडे वाढली तर जैवविविधता टिकेल, पशू पक्षी समृद्ध होतील, असा पर्यावरण तज्ञ्जांचा दावा आहे.
सध्या पशू- पक्षी, प्राण्यांना अन्न कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने त्यांना ते शिवार व मानवी वस्तीकडे येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष सध्या सुरू झाला आहे. डोंगर भाग पठार दऱ्या खोरी जंगलातील वन्यजीव पशुपक्षी यांच्या निवाऱ्यासाठी केवळ देशीच वृक्षांची लागवड करावी लागणार आहे.
शासनाने देशी झाडेच लावण्यासाठी निर्बंध आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बांधावर देशी वृक्ष लागवड करावी तसेच गायरान रस्त्याच्या दुतर्फा देवस्थानच्या रिकाम्या जमीनीवर देशी वृक्ष लागवड करून त्याची जोपासणे करण्यासाठी शासकीय पातळीवर अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. महत्त्वाचे म्हणजे देशी वृक्षतोडीवर कडक निर्बंध असावेत.
--------
जोतिबा डोंगरावर १२० जातींचे पक्षी
जोतिबा डोंगर परिसरात कोल्हापूरातील पक्षीमित्र दिलीप पाटील यांनी निरिक्षण करून, येथे १२० जातींचे पक्षीविश्‍व प्रकाशात आणले. येथे कायमस्वरूपी वास्तव्यात असणारे पक्षी - मोर. लांडोर . किंगफिशर, बगळा, बहेरी ससा, टिटवी, भोरड्या, राखी, धनेश, सुतारपक्षी, चित्तूर, कुकड कोंबडा, सातभाई आदींचा समावेश आहे.
---------
स्थलांतरीत करून येणारे पक्षी
पानकावळा, बॅल्क इगल, स्वर्गीय नर्तक, बॅल्क रेड स्टार, ग्रे हेडेड हे पक्षी स्थलांतरीत करून येतात.
-----------
कोट
सध्या देशी लागवडीशिवाय पर्यायच नाही. देशी झाडे जगली तरच जंगलातील पशुपक्षी जगतील. विदेशी झाडामुळे या पशू पक्षी प्राण्यांचे वैभव नष्ट होत आहे. प्राणी, पशू, पक्षी हे निवारा शोधण्यासाठी गावात शहरात येऊ लागली आहेत. त्यासाठी देशी झाडे लावण्यासाठी जागर आवश्यक आहे. - सुरेश बेनाडे, निसर्ग मित्र पोहाळे तर्फ आळते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT