लोगो- एसआयआयएलसी
किचन गार्डनमध्ये
पिकवा सेंद्रिय भाजीपाला
पुणे, ता. ६ : किचन गार्डन प्रकारात टेरेस, बाल्कनी, उभ्या भिंती, घराच्या आतील रिकाम्या जागेत सेंद्रिय भाजीपाला घेणे शक्य आहे. किचन गार्डनद्वारे भाजीपाला उत्पादनाचे मार्गदर्शन करणारे प्रमाणपत्र प्रशिक्षण शनिवारी (ता. ८) व रविवारी (ता. ९) होत आहे. यात टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन, इनडोअर भाजीपाला गार्डन, आउटडोअर भाजीपाला गार्डन, जनरल किचन गार्डन इ. प्रकार, टेरेस वा घराजवळील जागेत भाजीपाल्याशिवाय हंगामी कोणकोणती फुलझाडे व शोभेची झाडे आपण लागवड करू शकतो, त्यासाठीचे नियोजन, माती व कुंड्या भरण्याची पद्धती तसेच अन्नद्रव्य आणि रोग-कीड नियंत्रण इ.विषयी मार्गदर्शन होईल. प्रात्यक्षिक अनुभवासाठी व्हेजिटेबल स्टार्टर सीड कीट मोफत दिली जाणार आहे. तसेच सेंद्रिय भाजीपाला पिकविणाऱ्या किचन गार्डनला भेटीचे आयोजन केले आहे. प्रतिव्यक्ती शुल्क तीन हजार रुपये.
पॅकेजिंग व्यवसायातील संधी
पॅकेजिंग मटेरिअल कसे तयार करतात, त्यासाठी कोणती अद्ययावत यंत्रे लागतात, छोटी पॅकेजिंग इंडस्ट्री सुरू करण्यासाठी भांडवल इ.विषयी माहिती करून देणारा चार विकेंडला चालणारा सर्टिफिकेट कोर्स या शनिवारपासून (ता. ८) सुरु होत आहे. यामध्ये पॅकेजिंग इंडस्ट्रीतील ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेले नामवंत सल्लागार शैलेश जयवंत मार्गदर्शन करणार आहेत. ज्यांना पॅकेजिंगमध्ये स्टार्ट-अप सुरु करायचे आहे किंवा सुरु असलेल्या व्यवसायातील पॅकेजिंग युनिटमधील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यायचे आहे आदींसाठी हा कोर्स फायदेशीर आहे. प्रात्यक्षिक अनुभवासाठी दोन पॅकेजिंग इंडस्ट्रीला भेटीचे नियोजन केले आहे. प्रतिव्यक्ती शुल्क १६,५०० रुपये.
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.
नोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.