कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील या नऊ भुस्खलन प्रवण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

CD

पन्हाळ्यातील ९ भुस्खलनप्रवण
परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

पन्हाळा, ता.२६ः तालुक्यात मागील चार वर्षांपासून सातत्याने भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यातील नऊ ठिकाणे भुस्खलन प्रवणक्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या भुस्खलन प्रवणक्षेत्र परिसरात येणाऱ्या गावांना पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे -जाधव यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भुस्खलनामुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील बादेवाडी डोंगर, पोहाळवाडी डोंगर, गिरोली जोतिबा डोंगर, पावनगड डोंगर, मंगळवार पेठ ते पन्हाळा डोंगर, बुधवार पेठ परिसर मुख्य रस्ता, मराठवाडी, म्हाळुंगे ॲडव्हेंचर पार्क, आपटी ही नऊ ठिकाणे भुस्खलन प्रवणक्षेत्र घोषित केली आहेत. या नऊ ठिकाणच्या परिसरात येणाऱ्या गावातील नागरिकांना तहसीलदारांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. भुस्खलनामुळे कोणत्याही प्रकारे जीवित वा वित्तहानी होऊ नये म्हणून तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील यांना सूचना दिल्या आहेत. त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT