कोल्हापूर

खरिप हंगामाच्या मशागतीसाठी बळीराजाला पुर्व हंगामी पावसाची प्रतीक्षा पन्हाळा तालुक्यातील चित्र

CD

बळीराजाला पूर्वहंगामी पावसाची प्रतीक्षा
पन्हाळा तालुका ; खरिपाच्या मशागतीसाठी गरज

सकाळ वृत्तसेवा

पन्हाळा, ता. १२ ः खरीप हंगाम यशस्वीतेसाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत करतो. यंदा खरीप हंगामाच्या नियोजनासाठी पन्हाळा तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग सज्ज आहे.पण मृग नक्षत्रात जरी चांगल्या पावसाचे संकेत असले तरीही हंगामपूर्व पावसाची प्रतीक्षा करावी लागते आहे. त्यामुळे हवालदिल बळीराजा शेतशिवारात तयारी करताना दिसत नाही.
पन्हाळा तसा डोंगराळ तालुका. येथील बहुतांश शेतकऱ्यांची गुजराण खरीप पिकांवरच होते. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलिमीटर आहे. त्यामुळे खरीप हंगामात भात, ज्वारी, माका, नांगली, तृणधान्य, कडधान्य व तेलबियांचे चांगले उत्पादन होते. हाच खरीप हंगाम साधण्यासाठी बळीराजाबरोबरच कृषी विभागही सज्ज झाला आहे. मात्र खरीप हंगामाची पूर्वतयारीत जमिनीची मशागत महत्त्वाची असते. यावर्षी जमीन मशागतीसाठी आवश्यक पूर्वहंगामी पावसाने ओढ दिल्याने बळीराजाला पूर्वहंगामी पावसाची प्रतीक्षा आहे.
चालू वर्षी पेरक्षेत्राचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नात आहे. खरीप हंगामासाठी भात बियाणे ३०६० क्विंटल, सोयाबीन ३९० क्विंटल, भुईमूग १४५ क्विंटल, खरीप ज्वारी-५४ क्विंटल, मका २८ क्विंटल बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ती पूर्ण केली जाईल. खरीप हंगामासाठी मागणीनुसार पन्हाळा गटास युरिया ४४८४ टन, डीएपी-१२१२ टन, सुपर फॉस्फेट -११५५ टन, म्युरेट ऑफ पोटॅश-८२० टन, संयुक्त खते ५४०४ टन अशी एकूण १३०७५ टन खते उपलब्ध करून दिली जातील. भात बियाण्यांत वाएसआर, शुभांगी, सारथी, पूनम, सोना, यशोदा या बियाण्यांची मागणी होत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी के. एम. घोलप व कृषी अधिकारी पंचायत समिती पन्हाळा एस. व्ही. शिंदे यांनी दिली.

तालुक्यात पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तृणधान्य क्षेत्र*१०,०४२
भात*९३७०
ज्वारी*२४०
नागली*३७०
मका*५०

कडधान्य क्षेत्र*१५२ हेक्टर
तूर*३०
मूग*१४
उडीद*६
इतर कडधान्य*१०२

तेलबिया लागवड ५८०० हेक्टर
भुईमूग*३८५०
सोयाबीन*१९४८
तीळ*२

कोट...
खरीपासाठी लागणारी बी-बियाणे, खते, कीटकनाशके इ. शेती साहित्य तालुक्यातील निविष्ठा विक्री केंद्रात उपलब्ध करून दिली जातील. यातील गैरप्रकार टाळण्यासाठी निविष्ठा विक्री केंद्र तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना केली असून पथकामार्फत निविष्ठा विक्री केंद्र तपासणी होईल.
- के. एम. घोलप, कृषी अधिकारी, पन्हाळा

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर कृषी विभागही सक्रिय आहे.
- एस. व्ही. शिंदे, कृषी अधीकारी, पन्हाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

'कोणी गद्दारी केली, तर पक्षातून हकालपट्टी करणार'; चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना गर्भित इशारा

SCROLL FOR NEXT