विद्यार्थ्यांनी तयार केले चांद्रयान ३ चे पेपर मॉडेल
पेठवडगाव, ता. ११ : येथील आदर्श गुरुकुल विद्यालय, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कुल, सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थींनी चांद्रयान ३ याचे पेपर मॉडेल बनवले. यावेळी पेपर मॉडेल बनवण्याची कार्यशाळा घेतली. तज्कडून मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमात गुरुकुल विद्यालयाचे २१०, सायरस पुनावाला स्कुलच्या १३२ विद्यार्थींनी भाग घेतला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) अंतर्गत १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान ३ अवकाशात झेप घेणार आहे. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी मिशन एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रयान एक, दोन आणि तीन याची माहिती केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
चंद्रयान ३ याचे पेपर मॉडेल कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल या दोन्ही विद्यालयातील एकूण २१० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी आदर्श गुरुकुल ॲकॅडमीचे अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, मुख्याध्यापिका सौ. एम. डी. घुगरे यांचे प्रोत्साहन मिळाले. कार्यशाळेसाठी अशोक क्षीरसागर, रवींद्र मोरे, निसर्गप्रेमी मित्र पेठवडगावचे डॉ. अमोल पाटील, प्रकाश जगदाळे, जयराज तोडकर व नारायण कोळेकर यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.