कोल्हापूर

आराखडा रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

CD

02176
आराखडा रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
गुलाबराव पोळ ः वडगावमध्ये कृती समितीच्या आंदोलनाची सांगता
पेठवडगाव, ता. १३ : जुनी आरक्षणे उठवण्यासाठी आर्थिक व्यवहार झाले. त्यासाठी एजंटांची मदत घेतली गेली. अशा पध्दतीने आराखडा करणाऱ्या लोकांची माझ्याशी गाठ आहे. त्यांचा समाचार येणाऱ्या काळात जनता घेईल. विकास आराखडा रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन निवृत्त पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले
येथील विकास आराखडा विरोधी कृती समितीच्या वतीने गेली दहा दिवस धरणे आंदोलन सुरु होते.याआंदोलनाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्षा विद्या पोळ, माजी उपनगराध्यक्ष सुनील हुकेरी, विजूभाई शहा, गुरुप्रसाद यादव, शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष जगन्नाथ माने, बंडखोर सेनेचे शिवाजीराव आवळे, धरणग्रस्तांचे नेते दीपक पाटील, राजवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्षा विद्या पोळ म्हणाल्या, ‘विकास आराखडा करण्यात आमचा सहभाग नसल्याच्या थापा मारल्या जात आहेत. परंतु नविन वसाहतीमध्ये एका ठिकाणी हा विकास आराखडा उघडून त्यात बदल सुचवले गेले. यावरुन त्यांचा सहभाग होता हे सिध्द होते. या विरोधात शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देवुन जनतेसोबत रहाणार आहे.’ विजूभाई शहा, रणजीतसिंह यादव, अमोल हुकेरी, लमूवेल सनदी, मियालाल पटवेगार, रमेश दाभाडे, जवाहर सलगर, सुरज पाटील, दीपक पाटील यांची भाषणे झाली. जगन्नाथ माने यांनी प्रास्ताविक केले. शितल कोळी यांनी आभार मानले.
------------
विकास आराखडा तयार करताना तो खासगी ठिकाणी कसा पोचला? त्याठिकाणी ठरावीक लोकांना दाखवला गेला. त्यांच्या जमिनीवरील आरक्षण रद्द झाली. मग सामान्य लोकांचे काय? अशा सर्वसामान्य लोकांना, लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले असते तर ही वेळ आली नसती.
-विद्या पोळ, माजी नगराध्यक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT