गुरुकुल विद्यालयात
मातृ पितृ कृतज्ञता दिन
पेठवडगाव, ता. ४ : समाजातील एकत्र कुटुंबपद्धती बंद होत आहे. त्यामुळे नात्यातील माणुसकी जात आहे. अशा परिस्थितीत शाळेने माय-बाप आणि लेकरू यांचे नाते घट्ट करण्यासाठी मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा सुरू करून कुटुंब व्यवस्था मजबूत करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेत्री समृद्धी जाधव यांनी केले.
येथील आदर्श गुरुकुल ॲकॅडमीतील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, गुरुकुल प्राथमिक विद्यालयात मातृ पितृ कृतज्ञता दिन साजरा केला. प्रमुख पाहुणे म्हणून वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, इस्त्रोचे संशोधक शुभम यादव, डॉ. ऋतुराज तोडकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे पाद्यपूजन करून त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. डी. एस. घुगरे, निपुण कोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
आदर्श शिक्षण संस्थेच्या सचिव एम. डी. घुगरे, वारणा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, आदर्श शिक्षण समूह मिणचे उपाध्यक्ष प्रा. पी. एन. तोडकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.