कोल्हापूर

पुनाळ-तिरपण धरणातील कचरा काढला

CD

04989
पुनाळ : पुनाळ-तिरपण बंधाऱ्यातील कचरा जेसीबीच्या सहायाने काढण्यात आला.


पुनाळ-तिरपण बंधाऱ्यात
अडकलेला कचरा काढला
पुनाळ : येथील कासारी नदीवरील पुनाळ-तिरपण बंधाऱ्याच्या दरवाजांमध्ये अडकलेला कचरा धरण संस्थेने काढला. त्यामुळे वाहत्या प्रवाहातील अडथळा दूर झाला आहे. बंधाऱ्यातील अडकलेला कचरा जेसीबी यंत्राच्या सहायाने बाहेर काढण्यात आला. धरण संस्थेचे अध्यक्ष मारुती पाटील, उपाध्यक्ष नारायण येरुडकर यांच्या पुढाकाराने व संचालक, कर्मचारी यांच्या सहकार्याने कचरा काढण्यात आला. गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी क्षेत्रात कचरा आला होतो. त्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्यास अडथळा निर्माण होऊन पिल्लरना धोका वाढला होता. पुराने लाकडी ओंडके, झाडे, बेटे, कचरा बंधाऱ्याच्या दरवाजाजवळ अडकला होता. त्यामुळे संस्थेने याची दखल घेऊन बंधारा कचरामुक्त केला. यावेळी प्रकाश जाधव, सुनील पाटील, विलास चौगले, शरद पाटील, तानाजी डवरी, श्रीपती पाटील उपस्थित होते. याबाबत पुनाळ-तिरपण धरण संस्थेचे अध्यक्ष मारुती पाटील म्हणाले, ‘‘बंधाऱ्यात अडकलेल्या कचऱ्यामुळे बंधाऱ्याला धोका पोहोचतो. त्यामुळे तातडीने कचरा काढण्यात आला.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT