कोल्हापूर

सांगवडे जिन मंदिरात चातुर्मास कलश स्थापना

CD

सांगवडे जिन मंदिरात
चातुर्मास कलश स्थापना
सांगवडेवाडी, ता. ६ : आदिनाथ दिगंबर जैन मंदिर सांगवडे येथे आचार्य श्री १०८ कुंथुसागरजी महाराज यांचे परम शिष्य ज्ञानोपयोगी प.पू. आचार्य श्री १०८ पद्मनंदीजी महाराज व संघाच्या चातुर्मास पर्वानिमित्त विधीवत कलश स्थापना उत्साहात करण्यात आली.
या वेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना आचार्य म्हणाले, ‘‘चातुर्मास पर्वामध्ये मंगल-प्रवचन, समाज प्रबोधन, धार्मिक पूजाअर्चा, विधी- विधान इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे.
प्रारंभी सिद्धेश जैन बेंगलोर यांचे हस्ते ध्वजारोहण करून चातुर्मास पर्वास प्रारंभ करण्यात आला. चातुर्मास स्थापित प्रथम कलशाचा मान अजयकुमार कासलीवाल इंचलकरंजी, द्वितीय कलशाचा मान सुनील पेंढारी नागपूर यांना, तर तृतीय कलशाचा मान प्रदीप पाटील सांगवडे यांनी घेतला. या वेळी आचार्य श्रीचे पाद्य-प्रक्षालन, वस्त्रदान, शास्त्रदान, पुष्पृष्टी, गुरुदेव मंगल आरती करण्याचा लाभ भाविकांनी घेतला‌.
कार्यक्रमास छत्तीसगड, मुंबई, बेंगलोर, नागपूर, पुणे, इचलकरंजी येथील आचार्य श्री गुरुदेव यांचे भक्त, स्थानिक श्रावक- श्राविका, वीर महिला मंडळ, वीर सेवा दल, श्री आदिनाथ दिगंबर जैन मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT