कोल्हापूर

सांगवडेवाडी ता 14

CD

01531
छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी
सांगवडे, सांगवडेवाडीत मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा

सांगवडेवाडी, ता. १४ ः सांगवडे (ता. करवीर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती क्रांतिवीर तरुण मंडळातर्फे झाली. यावेळी प्रतिमापूजन अध्यक्ष अक्षय पाटील यांनी केले. पन्हाळ्यावरून कार्यकर्त्यांनी आणलेल्या ज्योतीचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. सकाळी दहा वाजता महिलांनी पाळणा गायला. सायंकाळी सात वाजता नेरली येथील ३० धनगरी ढोलाच्या तालावर व निगवे येथील ३० मुलांनी मर्दानी खेळांची आकर्षक प्रात्यक्षिके दाखवून मिरवणुकीत रंगत आणली. पालखीत धर्मवीर संभाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या पानाफुलांनी सजावट केली होती.
सांगवडेवाडी येथे संयुक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष प्रतीक खुडे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पन्हाळ्यावरून आणलेल्या ज्योतीचे स्वागत गावात करण्यात आले. गावातून मिरवणूक काढण्यात आली. सकाळी दहाला महिलांनी पाळणा गायला आणि सुंठवडा वाटप करण्यात आला. विनायक गनमाळे, विशाल चव्हाण यांच्यासह उत्सव कमिटीतील कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT