कोल्हापूर

कोथळी येथे गृहमतदानव्दारे जेष्ठ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

CD

02283
कोथळीत गृह मतदानाद्वारे
ज्येष्ठांनी केले मतदान

सोनाळी, ता. २ ः गृह मतदानाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा दिली आहे. त्यासाठी विकल्प दिलेल्या मतदारांनी निश्चित तारखांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी केले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत करवीर विधानसभा मतदारसंघातील कोथळी (ता. करवीर) येथे निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन गृह मतदान प्रक्रिया पार पाडली. येथील ज्येष्ठ नागरिक महिला मतदार कासुबाई धोंडीराम साळुंखे (वय ८५) व शामा हिरबा धनगर (वय ८६) यांनी आज घरी बसून मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूर लोकसभा मतदार संघामध्ये गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित केले असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त केली आहेत. ही मतदान पथके मतदारांच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेमुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT