कोल्हापूर

आदर्श कागलसाठी आमदारकीची संधी द्या

CD

2655
हसूर खुर्द : येथे शिबिरात मार्गदर्शन करताना समरजितसिंह घाटगे. समोर उपस्थित महिला.(छायाचित्र : सार्थक फोटो, कापशी)
.....
आदर्श कागलसाठी
आमदारकीची संधी द्या

समरजितसिंह घाटगे ः हसूर खुर्दला ‘समरजितसिंह आपल्या दारी’ अभियान

सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. ९ : ‘छत्रपती शाहू महाराजांचे आदर्श कागल निर्माण करण्याचे स्व. विक्रमसिंह घाटगे यांचे स्वप्न साकारण्यासाठी आमदारकीची संधी द्या,’ असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. हसूर खुर्द (ता. कागल) येथे राजे फाउंडेशन व जिजाऊ समितीतर्फे आयोजित ‘समरजितसिंह आपल्या दारी’ अभियानावेळी ते बोलत होते.
यावेळी विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे व बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले. ‘हेल्थ फॉर हर’ मोहिमेचा प्रारंभ आणि ४५० जणांची मोफत आरोग्य तपासणी केली. गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. मनीषा साळोखे यांच्या घरी अर्ज स्वतः भरून घेऊन समरजितसिंह घाटगे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचा प्रारंभ केला.
घाटगे म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराजांचा समाजकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित नागरिकांना लाभ देण्यासाठी ‘समरजितसिंह आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला. याचा १२ हजार लाभार्थ्यांना लाभ झाला. उर्वरित ठिकाणीही शिबिरे घेणार आहोत.’
जिजाऊ समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे म्हणाल्या, ‘संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांच्या आरोग्य तपासणीबाबत होणारा दुजाभाव टाळून त्यांची आरोग्य तपासणी, निदान व उपचारातून आरोग्यदायी कागल करण्यासाठी ‘हेल्थ फॉर हर’सारख्या उपक्रमातून सातत्याने प्रयत्नशील आहोत.’
शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सागर मोहिते, दिलीप तिप्पे यांनी मनोगत व्यक्त केले. निवृत्त कर्नल शिवाजीराव बाबर, सचिन मगदूम, प्रताप पाटील, डॉ. आरती देशमुख, विनायक सुतार, विजय पाटील, बी. डी. पाटील, अविनाश पाटील, रवींद्र घोरपडे, जगदीश मोरे, आदी उपस्थित होते. अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. शिवाजी माळवी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT