कोल्हापूर

सांगा साहेब आम्ही कोणाचे,ऐकायचे....

CD

84102
सांगा साहेब.. आम्ही कोणाचे ऐकायचे?

घंटागाडी स्पिकरच्या आवाजाचा त्रास; कर्मचारी गोंधळात

प्रदीप शिंदे ः सकाळ वृत्तसेवा

शाहू नाका, ता. १६ : ‘आमच्या दारात आवाज कमी करत जा.., काल घंटागाडीचे गाणे ऐकू आले नाही जरा मोठ्याने स्पिकर लावा.., सकाळी सकाळी कशाला गाणे लावून येता... असे नागरिकांच्या प्रतिक्रिया. साहेब नेमके आम्ही कोणाचे ऐकायचे, असा प्रश्न महापालिकेच्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना पडला आहे.
शहरासह उपनगरात सकाळी ‘इकडे कचरा तिकडे कचरा’ हे गाणे हमखास कानावर पडते. हे गाणे ऐकू आले की नागरिकांची पावले कचरा घेऊन गाडीच्या दिशेने पडतात. नाव घंटागाडी असले, तरी काम कचरा संकलनाचे आहे. कचरा संकलनासाठी वाहन आल्याचा संदेश गाण्यामार्फत दिला जातो. तसेच स्वच्छतेसंबंधी संदेश दिला जातो; मात्र काहीजण आमच्या काॅलनीत आल्यानंतर गाणे बंद करा, असा दमच कर्मचारांना देतात. दररोज घंडागाडीवरील कर्मचारी सकाळी सहा ते दुपारी दोन वेळेत ६०० घरांतील कचरा गोळा करतात. घंडागाडीवरील स्पीकरमुळे लांबपर्यंत गाण्याचा आवाज येत असल्याने अनेकजण दारात कचरा आणून ठेवतात. यामुळे कर्मचाऱ्यांचा कचरा संकलनातील वेळ वाचतो. तुझ्या गाण्याने झोपमोड झाली.., गाणे हळू लावत जा, अशा सूचना देतात. काहीजण ‘आम्हाला चौथ्या मजल्यावर गाणे ऐकू येत नाही, त्यामुळे गाणे मोठयाने लावत जा, असेही सांगतात. त्यामुळे घंटागाडीवरील चालक व कर्मचारी गोंधळून गेले आहेत. त्यांना नेमके कोणाचे ऐकायचे, असा प्रश्न पडला आहे. परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासह महापालिकेच्यावतीने घंटागाडीद्वारे कचरा संकलनाचा उपक्रम राबविला जातो. त्यामुळे थोडा वेळ आवाजासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी माफक अपेक्षा कर्मचारी करत आहेत.

चौकट
गाणे अंगवळणी
थोड्याफार तक्रारीही येत असल्या तरी बहुतांश नागरिकांनी ही पद्धत स्वीकारली आहे. कचरा संकलनासाठी भागात वाहन आल्याचा संदेश घेऊन आलेल्या गाण्यात स्वच्छतेसंबंधी अनेक टिप्सही आहेत. सकाळी हे गाणे कानावर पडल्यावर नकळत प्रत्येकजण ते गुणगुणतोच. त्यामुळे हे गाणे नागरिकांच्या चांगलेच अंगवळणीही पडले आहे.

कोट
घंटागाडीवरील स्पीकर बंद ठेवला तर प्रत्येकाच्या घरात जाऊन कचरागाडी आल्याचे सांगणे त्रासदायक व वेळखाऊ आहे. शहर स्वच्छ, सुंदर ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही, तर त्यासाठी नागरिकांचा पुढाकार आणि सहभागही महत्त्वाचा आहे. घंटागाडीवरील कर्मचारांना गाण्याबाबत सहकार्य करावे.
- लाला भोसले, माजी नगरसेवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT