कोल्हापूर

दत्त मंदिरावर मालकी दाखविण्याचा प्रयत्न

CD

दत्त मंदिरावर मालकी दाखविण्याचा प्रयत्न

आकनूरमधील जमीनमालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सरवडे, ता. ४ : आकनूर (ता. राधानगरी) येथील सार्वजनिक वहिवाटीतील दत्त मंदिर व दान केलेला परिसर न्यायप्रविष्ट बाब असताना काही लोक मंदिर व परिसरावर खासगी मालकी दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आनंदराव लहू पाटील व २५ जमीन मालकांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आकनूर येथे पाटील कुटुंबातील २६ लोकांनी दत्त मंदिरासाठी जमीन दान दिली; परंतु तत्कालीन तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील फेरफारमुळे मंदिरावर काही स्वार्थी लोक अधिकार सांगून मंदिर आणि जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिर परिसरातील शेतजमिनीस ७/१२ पत्रकी  नोंद केलेला फेरफार चुकीच्या पद्धतीने नोंदवला आहे. पूर्वीच्या फेरफारचा अमल चुकीने राहिल्याचे कारण देऊन दुरुस्तीचा फेरफार केला. दोन फेरफारमधील कालावधी तब्बल ५२ वर्षे ४ महिने २३ दिवसांचा आहे. तो मंडल अधिकारी व तलाठ्यांच्या संगनमताने दुरुस्त केला. त्यामुळे तो पूर्णतः बेकायदेशीर आहे.
फेरफारबाबत योग्य चौकशी होऊन जर तो बेकायदेशीर असेल तर संबंधित तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या कामाचे पुनर्विलोकन होऊन तो रद्द करावा, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि मूळ जमीनमालक यशवंत लहू पाटील, आनंदराव लहू पाटील आदींसह २६ जणांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. फेरफारबाबत योग्य चौकशी करून कार्यवाही न झाल्यास बेमुदत उपोषण करू.
...................
चौकट...
न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य...
दत्त मंदिर व परिसरातील जमिनीचा सात-बारा नियमानुसार मठाधिपती कै. कृष्णा पाटील व परिवार यांच्या नावावर आहे. सद्यःस्थितीत मंदिराची डागडुगी आणि सेवा पिढ्यानपिढ्या पाटील परिवार (बुवा माळकरी) करत आहे. गावातील दत्तभक्तांनी मंदिराच्या हॉलचे काम जिल्हा परिषदेच्या फंडातून केले; परंतु अपूर्ण अवस्थेतील काम चार लाख रुपये खर्च करून पाटील परिवाराने पूर्ण केले. मंदिराबाबतचा लढा न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय जो निकाल देईल, तो आम्हाला मान्य आहे; परंतु असे असतानाही काही विघ्नसंतुष्ट मंडळी शांतता भंग करून गावातील वातावरण बिघडविण्याचा नाहक प्रयत्न करत आहेत. आमच्यावर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी बेमुदत उपोषण करू, असा इशारा पाटील परिवाराने (बुवा माळकरी) दिला आहे.
...................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT