कोल्हापूर

सरवडे

CD

‘बिद्री’ कारवाई निषेधार्थ मोर्चात
शेतकरी संघटना सहभागी होणार

सकाळ वृत्तसेवा
सरवडे : बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईविरोधात राधानगरी तहसीलवर बुधवारी (ता. ३) काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती युवा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पोवार यांनी दिली.
पोवार म्हणाले, ‘बिद्री साखर कारखाना हा चार तालुक्यातील जवळपास ६५ हजार सभासदांचा व ऊस उत्पादकांच्या मालकीचा कारखाना आहे. या कारखान्याने आजपर्यंत उच्चांकी दर देत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापनाने केलेला आहे. एका बाजूला सरकार इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देत असताना परवान्याचे निमित्त पुढे करून कारखान्यावर कारवाई होत असेल तर ही बाब चुकीची आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीने या कारवाईचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आम्ही निषेध करतो. तसेच ३ जुलै रोजी राधानगरी तहसील कार्यालयावर होणाऱ्या मोर्चामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.’
यावेळी कागल तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष पांडुरंग जरग, भुदरगड तालुका अध्यक्ष संजय देसाई व करवीरचे अध्यक्ष आनंदा पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT