कोल्हापूर

आंदोलन अंकुशची तहसिलदारांशी चर्चा

CD

00988
शिरोळ ः अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा या मागणीचे निवेदन आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
------------
आंदोलन अंकुशची तहसिलदारांशी चर्चा
संभाव्य महापूरः अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवण्याची मागणी
शिरोळ, ता.२६ ः संभाव्य महापुराबाबत कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे विजयराव दिवान व आंदोलनचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांच्याशी चर्चा केली. अलमट्टी धरणातील विसर्ग एक लाख क्युसेक्सपेक्षा अधिक वाढवावा यासाठी राज्य शासनाने कर्नाटक शासनावर दबाव टाकावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन आंदोलन अंकुशतर्फे श्री. हेळकर यांना दिले.
पंचगंगा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीपेक्षा अधिक झाल्याने नजीकच्या काळात शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. राजापूर बंधाऱ्यावरून महाराष्ट्रातून, कर्नाटककडे एक लाख चोवीस हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. तथापि अलमट्टी धरणामधून होणार विसर्ग वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
अलमट्टी धरण परिचलन नियमावली २००१ नुसार, कर्नाटक शासनाने जुलैअखेर अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१३.२०मीटर ठेवणे आवश्यक असताना सध्या अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१६ मीटर ठेवली आहे. यामुळे सध्या पंचगंगा नदीचा फुगवटा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातील विसर्ग एक लाख क्युसेक्सपेक्षा अधिक वाढवावा म्हणून, राज्य शासनाने कर्नाटक शासनावर दबाव टाकावा. तसेच नजीकच्या काळात शिरोळ तालुक्यात महापूर आल्यास पूरबाधित नागरीक व जनावरांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने सोय उपलब्ध करून द्यावी. नागरिक व जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय महसूल विभागाने करावी, अशी मागणी यावेळी केली. आंदोलन अंकुशचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, प्रवीण माने, कृष्णा महापुर नियंत्रण कृती समितीचे प्रभाकर केंगार, सर्जेराव पाटील, प्रदीप वायचळ, प्रमोद माने, आदी उपस्थित होते.
---------
मागण्यांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल. याकामी वरिष्ठांकडे पाठपुरावा करू.
-अनिलकुमार हेळकर, तहसिलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT