कोल्हापूर

पंडेवाडीचा धनलक्ष्मी गट प्रथम

CD

03045 (बक्षीस वितरण फोटो घेणे)
अंबप : येथे अशोकराव माने सोशल नेटवर्किंग फाउंडेशन व एकता सखी मंच आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे विजेत्या पंडेवाडी (ता. राधानगरी) येथील धनलक्ष्मी बचत गटाला विजयसिंह माने, मनीषा माने यांच्याहस्ते बक्षीस दिले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
--------------
पंडेवाडीचा धनलक्ष्मी गट प्रथम
अंबपमध्ये झिम्मा फुगडीत मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
टोप, ता. १३ : झिम्मा-फुगडीने धरलेले रिंगण अन् फु बाई फुऽऽ चा घुमणारा आवाज अशा उत्साही वातावरणात आणि नटूनथटून, विविध आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या महिला व मुली झिम्मा-फुगडी, काटवटकणा, उखाणे, छुई-फुई, घागर घुमवणे, सूप नाचवणे अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळामध्ये दंग झाल्या होत्या. निमित्त होते अंबप (ता. हातकणंगले) येथील अशोकराव माने सोशल नेटवर्किंग फाउंडेशन व एकता सखी मंच यांच्यावतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेचे. स्पर्धेत सहभागी महिलांनी मराठमोळ्या संस्कृतीचे व स्त्रीशक्तीचे दर्शन घडवले. स्पर्धेत पंडेवाडी (ता.राधानगरी) येथील धनलक्ष्मी बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धा अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या मैदानावर झाली. दोन लाखांची बक्षिसे असलेल्या स्पर्धेत विविध भागातून ५० संघ सहभागी झाले. स्पर्धेचे उद्‍घाटन वारणा बाझारच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे व जिल्हा परिषद माजी सदस्या मनीषा माने यांच्याहस्ते हवेत फुगे सोडून झाले. स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने यांच्याहस्ते झाले. सरपंच दीप्ती माने, डॉ. विभावरी माने, धनश्री जाधव, जयश्री जाधव, उज्वला जाधव, राजेंद्र माने, विश्वनाथ माने आदी उपस्थित होते. आभार अश्विनी माळी यांनी मानले.
स्पर्धेतील विजेते असे ः धनलक्ष्मी बचत गट (पंडेवाडी), सांस्कृतिक ग्रुप (पोखले), ज्ञानेश्वर माऊली ग्रुप (चंद्रे), विनायक महिला बचत गट (अंबप), गोसावीनाथ सखी मंच (गडहिंग्लज), नारायणी ग्रुप (शिरोली पुलाची), जिजामाता ग्रुप (तळंदगे), महागौरी झिम्मा फुगडी (वारणानगर). वैयक्तिक बक्षिसे- आरती कोळी, प्रणाली जाधव (झिम्मा), माया पाटील, साक्षी पाटील (चुईफुई), मनीषा बेलवणकर, भारती सुर्यवंशी (उखाणे), अमृता जगताप, मृणाल जगताप (फुगडी), रुपाली जाधव (सुप नाचवने), सोनाली पाटील, रिया वळीवडेकर (घागर घुमवणे), अंजना गायकवाड (काटवट कना), सुप्रिया गायकवाड (घोडा घोडा).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT