कोल्हापूर

बॉक्साईट चोरी

CD

04322
...

दुर्गमानवाड, तळगाव परिसरात
बॉक्साईटची राजरोस तस्करी
राशिवडे बुद्रुक, ता. २९ : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड, तळगाव परिसरातील डोंगरांमध्ये विनापरवाना बॉक्साईटची तस्करी राजरोस सुरूच आहे. तळगावच्या डोंगरकुशीत असलेल्या पाझर तलावाला लागून व चाफेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बॉक्साइट उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. महसूल खात्याचेही दुर्लक्ष असल्याचा सूर शेतकऱ्यांकडून निघत आहे.
दुर्गमानवाड परिसरातील चाफेवाडी, धुमाळवाडी परिसरात असलेल्या पडीक जमिनीमधून जेसीबीद्वारे उत्खनन करून बॉक्साइट रातोरात गायब करणारी राधानगरी व भुदरगड परिसरातील टोळी कार्यरत आहे. दुर्गमानवाड तलाठी सज्जात जेसीबीचा आवाज ऐकू येईल इतक्या अंतरावर उत्खनन सुरू आहे. पाझर तलावाच्या भिंतीवरूनच गेलेल्या मार्गाने पुढे गेल्यास येथे ठिकठिकाणी परिसर खणलेला आहे. ट्रकचे माग दिसतात. येथे रात्री उत्खनन केले जाते. हे ट्रक महसूल खात्याच्या तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयाच्या दारावरून जातात तरीही त्याचा त्यांना पत्ता नाही. याबाबत तहसीलदार अनिता देशमुख यांना विचारले असता सध्या निवडणूक प्रशिक्षणात सगळे अडकून असल्याने चौकशी करणे अडचणीची ठरत असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT