कोल्हापूर

मृतदेह सापडले

CD

दुधगंगा नदीत वाहून गेलेल्या
दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले
राधानगरी, ता. २ : काळम्मावाडी धरण पायथ्याला दुधगंगा नदीत वाहून गेलेल्या दोन युवकांचे मृतदेह आज सापडले. गणेश चंद्रकांत कदम (वय १८ ) व प्रतीक संजय पाटील (२२, दोघेही रा. निपाणी) हे काल दुधगंगेच्या प्रवाहात वाहत गेले होते. कालपासून रेस्क्यू टीम व पोलिस तपास करीत होते.
सोमवारी वर्षा पर्यटनासाठी निपाणीतील १३ युवक एका खासगी गाडीतून येथे आले होते. नदीमध्ये गणेश हा पाण्यात तोंड धुण्यासाठी उतरला असता अचानक तोल जाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गाडीचा चालक प्रतीक याने उडी घेतली व तोही बुडाला. सोमवारपासून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, ते सापडले नव्हते. मुळातच या नदीपात्रात दगडावरून पाणी आपटून मोठमोठे खड्डे आणि डोह तयार झाले आहेत. ऐन उन्हाळ्यातही या ठिकाणी धोकादायक परिस्थिती असते. सध्या तर पावसामुळे प्रवाह गतिमान झाला आहे.
राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक खंडू गायकवाड व जीवनरक्षक दिनकर कांबळेंसह रेस्क्यू टीमचे सोमवारपासून नदीपात्रात उतरून शोधकार्य सुरू होते. पावसामुळे बचाव पथकाला अडथळा निर्माण होत होता. मंगळवारी सकाळी बाराच्या सुमारास सर्वप्रथम प्रतीक याचा मृतदेह सापडला. त्यानंतर अर्ध्या तासाने गणेश याचाही मृतदेह सापडला. पोलिसांनी उत्तर तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. पाठोपाठ झालेल्या या घटनांमुळे काळम्मावाडी परिसरातील दुधगंगा नदीपात्र हे धोकादायक पर्यटनस्थळ असल्याचे आता निश्‍चित झाले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांनी उतरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT