कोल्हापूर

वाहतूक नियमांचे धडे देणारे "त्रिदेव' 

राजेश मोरे

कोल्हापूर : वाहतुकीचे नियम, त्याचे पालन कसे करावे, हे आरएसपीच्या माध्यमातून घराघरांत पोहचविण्याचे कार्य शहर वाहतूक शाखेतील "त्रिदेव' अनेक वर्षे करीत आहेत. नियमांचे पालन स्वतः व इतरांना करायला भाग पाडणारी भावी पिढी तयार करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील शाळाशाळांतून याबाबत प्रबोधन केले जात आहे. 

पोलिस दलात रुजू झाल्यानंतर एलसीबी, गुन्हे शोधपथक अशा खास शाखेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या कमी नाही; पण शहर वाहतूक शाखेत काम करणारे सहायक फौजदार शिवाजी गोणी, पोलिस नाईक नवनाथ टिपुगडे आणि पोलिस हवालदार आनंदा दळवी हे मात्र त्याला अपवाद ठरले. पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्याबरोबर सामाजिक बांधिलकीही जपण्याचे काम ते करत आहेत. शिक्षण विभाग व पोलिस दलातर्फे जिल्ह्यात "आरएसपी'चा उपक्रम राबविला जातो. अशा उपक्रमात श्री. गोणी, टिपुगडे व दळवी सक्रिय आहेत. कर्तव्य सांभाळत ते शाळाशाळांत जाऊन वाहतूक नियमांचे पालन कसे करावे? याचे प्रबोधन करतात.

वाहन चालविण्याचे लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवायचे नाही, आसन क्षमतेचा भंग करायचा नाही, दारू पिऊन वाहन चालविण्याचे धोके, त्याच्या कारवाईचे स्वरूप अशा अनेक नियमांची, स्पीडगन, ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह कारवाईचे मशीन आदींसह कारवाईची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. या प्रबोधनातून वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे अपघात अगर कारवाईची जाणीव विद्यार्थ्यांत निर्माण होत आहे. 

दृष्टिक्षेपात... 
*जिल्ह्यात "आरएसपी'च्या शाळा ः 133 
*शहरातील शाळा ः 47 

*प्रबोधनाची मोहीम... 
*शाळांमध्ये वाहतूक नियमांचे वर्ग 
*उत्कृष्ट गणवेश, संचलन, हातद्वारे सिग्नलची माहिती 
*नियमांबाबत तालुका व जिल्ह्यास्तरीय स्पर्धा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT