Mumbai-Kolhapur Koyna Express Accident esakal
कोल्हापूर

Koyna Express Accident : कोल्हापुरात कोयना एक्स्प्रेसनं तिघींना चिरडलं; दोन महिलांसह लहान मुलगी जागीच ठार

कोल्हापुरातून अपघाताबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईहून कोल्हापूरला येणारी कोयना एक्स्प्रेस (Mumbai-Kolhapur Koyna Express) मार्केट यार्डपासून पुढे कोल्हापूर स्थानकाच्या दिशेने येत होती.

कोल्हापूर : कोल्हापुरातून अपघाताबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसनं काल (शुक्रवार) रात्री तिघांना चिरडलं आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्डजवळ (Market Yard) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याचे काहींनी सांगितले. मुंबईहून कोल्हापूरला येणारी कोयना एक्स्प्रेस (Mumbai-Kolhapur Koyna Express) मार्केट यार्डपासून पुढे कोल्हापूर स्थानकाच्या दिशेने येत होती. याचवेळी विक्रमनगरकडून मार्केट यार्डच्या दिशेने या तिघीजणी रुळावरूनच चालत जात होत्या. याचवेळी भरधाव आलेल्या कोयना एक्स्प्रेसने तिघींनाही चिरडलं.

रेल्वेची जोरदार धडक

या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला, तर दुसरी महिला आणि लहान मुलगी दुसर्‍या बाजूला पडल्या. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने दोन महिलांचे चेहरे छिन्नविच्छिन्न झाले. तर, लहान मुलगीही जागीच ठार झाली. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी आणि शाहूपुरी पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अजय सिंदकर सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT