Dudhganga River Kalammawadi Dam esakal
कोल्हापूर

'गणेश, आता आम्ही कोणाकडं बघायचं..'; आईनं फोडला टाहो, पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांचा नदीत बुडून दुर्दैवी अंत

सकाळ डिजिटल टीम

गणेश पाण्यात तोंड धुण्यासाठी उतरला असता अचानक तोल जाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गाडीचा चालक प्रतीक याने उडी घेतली.

राधानगरी : काळम्मावाडी धरण (Kalammawadi Dam) पायथ्याला दूधगंगा नदीत (Dudhganga River) काल निपाणीचे दोन युवक वाहून गेले. गणेश चंद्रकांत कदम (वय १८) व प्रतीक संजय पाटील (२२, दोघेही रा. आंदोलननगर, निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. महिन्यापूर्वी याच परिसरात एक युवक बुडाला होता. ही घटना ताजी असतानाच आज त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडली.

याबाबतची माहिती अशी : निपाणीतील १३ युवक एका खासगी गाडीतून वर्षा पर्यटनासाठी या परिसरात आले होते. सकाळी काळम्मावाडी धरण पाहून पायथ्याला नदीमध्ये असलेल्या पिकनिक पॉईंटजवळ आले. येथे गणेश पाण्यात तोंड धुण्यासाठी उतरला असता अचानक तोल जाऊन बुडू लागला.

त्याला वाचवण्यासाठी गाडीचा चालक प्रतीक याने उडी घेतली; मात्र दोघांनाही बाहेर पडता आले नाही. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खोलात गेले. गणेशला पोहता येत नव्हते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ते सापडले नाहीत.

यानंतर राधानगरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड, भैरवनाथ पाटील, रघुनाथ पोवार घटनास्थळी आले. बचाव कार्यातील जयसिंग किरुळकर, धोंडिराम राणे यांच्या प्रयत्नातून नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. पावसामुळे आणि वाहत्या नदीमुळे शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे. अद्याप दोघेही बेपत्ताआहेत. घटनास्थळावर दोघांचेही कुटुंबीय आले होते. गणेश नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता.

मन हेलाविणारा आक्रोश

दोघांच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. ‘’गणेश, आम्ही कोणाकडे बघायचं, असं म्हणत त्याच्या आईने फोडलेला टाहो अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणून गेला.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT