Construction Site in Kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur : लोखंडी सळई गळ्यातून आरपार गेल्याने मजुराचा दुर्दैवी अंत; विसरलेला मोबाईल घेण्यासाठी आला अन्..

सकाळ डिजिटल टीम

तो बिहारी मित्रांना भेटण्यासाठी साडेचारच्या सुमारास काही वेळ आला होता. पहिल्या मजल्यावरून खाली उतरल्यानंतर त्याचा मोबाईल विसरल्याचे त्याच्या लक्षात आले.

कोल्हापूर : विसरलेला मोबाईल (Mobile) घेण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी आलेल्या परप्रांतीय मजुराचा उंचावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. हरिओमनगर येथील बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली. आनंद कपूरचंद मिश्रा (वय २७, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. पोटात व गळ्यातून आरपार गेलेल्या लोखंडी सळईमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये (CPR) आणले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हरिओमनगर येथे बांधकाम ठेकेदार विनोद राठोड यांनी घराचे काम घेतले आहे. येथे परप्रांतीय मजूर गवंडी काम करत होते. त्यांच्याकडेच कामाला असलेल्या आनंद मिश्रा याने मंगळवारी सुटी घेतली होती.

तो बिहारी मित्रांना भेटण्यासाठी साडेचारच्या सुमारास काही वेळ आला होता. पहिल्या मजल्यावरून खाली उतरल्यानंतर त्याचा मोबाईल विसरल्याचे त्याच्या लक्षात आले. तो मोबाईल घेण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेला होता. इतक्यात पाय घसरून तो खाली कोसळला. पिलरची सळई त्याच्या गळ्यातून आरपार गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT