Kolhapur Crime esakal
कोल्हापूर

प्रेयसीसोबत झालेल्या भांडणातून परप्रांतीय चांदी कारागिरनं उचललं टोकाचं पाऊल..; तलावात उडी मारुन संपवलं जीवन

सकाळ डिजिटल टीम

जितेंद्र सरवन सिंग हा गेल्या तीन वर्षांपासून रेंदाळ येथील माने नगरातील एका चांदी कारखान्यात चांदी जोडकाम करण्याच्या कामास होता.

हुपरी : चांदी कारागीर असलेल्या एका परप्रांतीय तरुणाने येथील सूर्य तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र सरवन सिंग (वय २०, रा. सध्या माने नगर, रेंदाळ. मूळ गाव हरदयाळ, अकोला, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ५) रात्री घडली. प्रेयसीबरोबर किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी होती.

पोलिसांनी (Hupari Police) दिलेली माहिती अशी की, जितेंद्र सरवन सिंग हा गेल्या तीन वर्षांपासून रेंदाळ येथील माने नगरातील एका चांदी कारखान्यात चांदी जोडकाम करण्याच्या कामास होता. त्याच्या भागातील चार ते पाच कामगार त्याच्या हाताखाली कामास होते. शनिवारी (ता. ५) रात्री साडेसातच्या सुमारास त्याने गावाकडे असलेल्या बहिणीला फोन करून आपण हुपरी येथे राहत असलेल्या घराशेजारील तलावात आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

त्यामुळे घाबरलेल्या बहिणीने त्याच्या येथील मित्राला फोन करून जितेंद्रबाबत माहिती सांगून त्याचा शोध घ्यायला सांगितले. त्यानुसार जितेंद्रचा शोध घेतला असता तलावाच्या काठावर त्याच्या चपला, मोबाईल फोन व ब्लू टूथ आढळून आले. रात्री उशिरापर्यंत तलावात शोधकार्य सुरू होते. आज सकाळी शोधासाठी रेस्क्यू टीम पाचारण केली होती. मात्र, तत्पूर्वी त्याचा मृतदेह तलावातील पाण्यावर तरंगताना आढळून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

Haryana Assembly Election Result: भाजपच्या विजयामागे EVM बॅटरीचा काय संबंध? ''99 टक्के चार्जिंग असेल तर भाजपचा विजय'' काँग्रेसचे आरोप

Pune News : जिल्ह्यातील सव्वातीन लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ६० कोटी रुपये अनुदान वर्ग

Pune News : शरद पवार यांची बोपदेव घाटात घटनास्थळी भेट

SCROLL FOR NEXT