Kolhapur Esakal
कोल्हापूर

‘लाखों’च्या स्‍वप्‍नांचा झाला चुराडा : सांताक्‍लॉज गिफ्‍ट देणार का?

टोकनवरच समाधान; बिनविरोधने मतदारांचा अपेक्षाभंग

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad 2021) बिनविरोध झाली आहे. राज्यातील सर्वाधिक खर्चाची निवडणूक म्‍हणून कोल्‍हापूरची (Kolhapur) ओळख आहे. यावेळीही मतदारांना पहिली उचल देऊन सहलीवर पाठवले होते. मात्र, अचानकच निवडणूक बिनविरोध झाल्याने मतदारांचा स्‍वप्‍नभंग झाला. रातोरात पंचतारांकित सुविधा गुंडाळून मतदारांची वाहने कोल्‍हापूरच्या दिशेने धावू लागली आहेत.

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)व भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक(Amal Mahadik) यांच्यात दुरंगी लढत होत होती. प्रचारही दमदार सुरू होता. दोन्‍ही उमेदवारांनी विजयाचा दावाही केला होता. पंधरा दिवसांपासून मतदारांना सहलीवरही पाठवले जात होते. सहलीवर जाण्यापूर्वी दोन्‍हींकडून टोकन पोहोच केले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार नाशिक येथे, तर भाजप आघाडीचे उमेदवार गोवा येथे मुक्‍कामी होते. सर्व पंचतारांकित व्यवस्‍था होती. बहुतांश सदस्य सहकुटुंब, तर काहीजण पै-पाहुण्यांसह रिसॉर्टमध्ये एन्‍जॉय करत होते.

पंधरा दिवसांपासून मतदारांना सहलीवरही पाठवले जात होते. सहलीवर जाण्यापूर्वी दोन्‍हींकडून टोकन पोहोच केले होते.

विधान परिषदेसाठी १० डिसेंबरला मतदान असल्याने २० दिवसांच्या सहलीच्या तयारीने मतदार गेले होते. काहींनी तर विधान परिषदेच्या भरोशावर वाहनांचे तसेच फ्‍लॅटचे बुकिंग करूनच सहलीच्या बसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, शुक्रवारी (ता. २६) सकाळीच निवडणूक बिनविरोधची चर्चा सुरू झाली आणि पायाखालची वाळू घसरली. माहितीची खात्री करण्यासाठी फोन खणाणू लागले. दुपारी १२ पर्यंत बिनविरोधची खात्री पटल्याने मतदारांचा मूडच बदलला. दुपारी निवडीची घोषणा झाली अन्‌ नाईलाजाने बॅगा भरून मतदारांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

सांताक्‍लॉज काय करणार?

विधान परिषदेला सांताक्‍लॉजरूपी उमेदवार सतेज पाटील उभे असून ते मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असे मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक यांच्यासह कैक नेत्यांनी पाटील यांचा अर्ज भरताना जाहीर केले होते. दरम्यान, सहलीवर पाठवताना मतदारांना टोकनही पोहोच केले. मात्र, निवडणूक बिनविरोध झाल्याने पुढचे हप्‍तेही थांबणार आहेत. या घडामोडीबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माफी मागत मंत्री पाटील यांनाच मतदारांकडे पाहण्याचा सल्‍ला दिला आहे. या सल्‍ल्यानंतर तरी सांताक्‍लॉज मतदारांना अपेक्षित गिफ्‍ट देणार का, अशी चर्चा आहे.

कोट्यवधींचा चुराडा थांबला

या निवडणुकीचा खर्च राज्यात नेहमीच सर्वाधिक राहिला आहे. यावेळी १२० ते १५० कोटी खर्चाची चर्चा होती. यात मतदारांना लक्ष्‍मीदर्शन करण्यासह सहकुटुंब हवाई सहली, पंचतारांकित व्यवस्‍था, प्रवासासाठी आलिशान वाहने आदींवर खर्च होत असे. मात्र, निवडणूक बिनविरोध झाल्याने हा शेकडो कोटींचा खर्च वाचला असून चांगला पायंडा पाडल्याबद्दल सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्‍त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना..! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब

Nagpur South Assembly Election 2024 Result: प्रतिष्ठेची लढत भाजपने जिंकली, नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे मोहन मते यांचा विजय

Sports Bulletin 23rd November: पर्थ कसोटीत भारताकडे भक्कम आघाडी ते उद्या आयपीएल २०२५ चा मेगा ऑक्शन रंगणार

Rohit Pawar Won Karjat-Jamkhed Assembly Election 2024 Result Live: रोहित पवारांचा अटीतटीचा विजय; राम शिंदेंना दुसऱ्यांदा दिली मात

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT