Vijay Devne vs Sunil Shintre esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : 'हा' नेता सुडाच्या राजकारणाचा ठरला बळी? ठाकरे गटात अस्वस्थता, पदावरून हटवताच देवणे 'नॉट रिचेबल'

देवणे हे मूळचे डाव्या आघाडीचे नेते होते.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील ११० पैकी १०६ पदाधिकाऱ्यांनी लोकसभेच्या तोंडावर देवणे यांना हटवू नये, अशी मागणी केली होती.

Kolhapur Politics News : गडहिंग्लज शेती उत्पन्न बाजार समितीच्या (Gadhinglaj Krushi Utpanna Bazar Samiti Election) निवडणुकीवरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे (Vijay Devane) यांच्यावर कारवाई झाल्याचे बोलले जाते. गेली १२ वर्षे जिल्हाप्रमुख असलेल्या देवणे यांना हटवल्याने ऐन लोकसभेच्या तोंडावर पक्षांतर्गत नाराजी निर्माण झालीये.

या कारवाईमुळे नाराज झालेले देवणे दोन दिवसांत भूमिका मांडणार आहेत. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावरून देवणे यांना नुकतंच हटवून त्यांच्या जागी सुनील शिंत्रे यांची नियुक्ती केली. फेररचनेत देवणे यांना सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिली. या कारवाईचा मागोवा घेतला असता गडहिंग्लज बाजार समितीची निवडणूक याचे मूळ कारण असल्याचे पुढे आले आहे.

बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेला एक जागा देण्याचे ठरले होते. निवडणुकीसाठी शिवसेनेच्या १८ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात सर्वानुमते आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार यांना संधी देण्याचे ठरले. त्यानुसार पोवार निवडून आले. याच निवडणुकीत शिवसेनेकडून शिंत्रे यांच्या पत्नी सौ. श्रद्धा यांनीही अर्ज दाखल केला होता. त्यांची उमेदवारी मात्र काँग्रेसकडून आणि तेही राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी जाहीर केली.

श्रद्धा शिंत्रे शिवसेनेच्या नगरसेविका असून, त्यांनी बाजार समिती निवडणूक पक्षादेशाचे पालन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र जिल्हाप्रमुख म्हणून देवणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. देवणे यांनी हे पत्र का पाठवले? यावरून शिंत्रे विरुद्ध देवणे असा संघर्ष सुरू झाला होता. त्यातून सुडाच्या राजकारणाचे देवणे बळी ठरल्याचे बोलले जाते.

जिल्ह्यातील ११० पैकी १०६ पदाधिकाऱ्यांनी लोकसभेच्या तोंडावर देवणे यांना हटवू नये, अशी मागणी केली होती; पण त्याचीही दखल ठाकरे यांनी घेतली नसल्याचे देवणे समर्थकांचा आक्षेप आहे. देवणे हे मूळचे डाव्या आघाडीचे नेते होते. २००५ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना शिवसेनेकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना डावलून खासदार प्रा. संजय मंडलिक यांना पक्षाने उमेदवारी दिली. नंतर प्रा. मंडलिक यांनीच ठाकरे गट सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पार्श्‍वभूमीवर २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा देवणे हेच उमेदवारीचे प्रबळ दावेदार असताना त्यांनाच डावलण्यात आले.

देवणे ‘नॉट रिचेबल’

या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर विजय देवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ‘नॉट रिचेबल’ आहेत. पण त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मात्र दोन दिवसांत ते भूमिका मांडणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT