क्रिकेट sakal
कोल्हापूर

Vikramgad : चर्चा तर होणारच ! 31 फर्स्ट निमित्त अस्सल मांसाहारी चषक 2022 : चक्क बोकड,गावठी कोंबडे बक्षीस

प्रत्येक गावा-गावात क्रिकेट सामने भरवले जात आहेत

अमोल सांबरे

विक्रमगड : ग्रामीण भागात क्रिकेटने तरुणाईला अक्षरश वेड लावले आहे. प्रत्येक गावा-गावात क्रिकेट सामने भरवले जात आहेत. 31 फर्स्ट निमित्त काही तरी वेगळे पण यावे यासाठी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे(माडाचा पाडा) या छोट्याशा पाड्यात 31 फर्स्ट निमित अस्सल मांसाहारी चषक 2022 भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे.या स्पर्धेची बक्षीस ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही

विजेत्या संघाला चक्क एक बोकड आणि चषक ऐवजी 1 Royal Stag खंबा बक्षीस दिला जाणार आहे. तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला चक्क दहा गावठी कोंबडे आणि चषक ऐवजी 1 Royal Stag खंबा तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला पाच गावठी कोंबडे आणि चषक ऐवजी 1 Royal Stag खंबा दिला जाणार असल्याचे आयोजकांन कडून पत्रक काढण्यात आले आहे. तर लगातार 2 सिक्स, 2 फोर, 2 विकेट काढणाऱ्या खेळाडूला एनर्जी ड्रिंक दिले जाणार आहे. 31 फर्स्ट निमित्त हे पत्रक प्रचंड व्हायरल होऊ लागले आहे. या बक्षीसाची तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे

क्रिकेट प्रेमी यंगस्टार क्रिकेट क्लब माडाचापाडा यांच्या वतीनं या भव्य अंडरआर्म स्पर्धा क्रिकेट स्पर्धा असणार आहे. गुरुवार 29 डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धा 29 डिसेंबर, 30 डिसेंबर, 31 डिसेंबर या कालावधीत खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे या स्पर्धे बाबत क्रिकेट प्रेमी मध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. पण आतापर्यंत तुम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या असतील, ऐकल्या असतील त्या स्पर्धांची बक्षीसही रोख रक्कम व चषक अशा स्वरूपात असते पण ही स्पर्धा 31 फर्स्ट निमित्त क्रिकेट रसिक यांच्यासाठी वेगळी ठरणार आहे.

क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेत्या प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या क्रिकेट संघाला चक्क बोकड बक्षीस म्हणून दिला जाणार आहे तर द्वितीय विजेत्या संघाला चक्क 10 गावठी कोंबडे दिला जाणार आहे तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला चक्क पाच गावठी कोंबडे बक्षीस दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी 400 रुपये प्रवेश फी असली तरी विक्रमगड परिसरातील परिसरातील अनेक क्रिकेट संघांनी या स्पर्धेत नाव नोंदणी सुरवात केली आहे. ही स्पर्धा गुरुवारी 29 डिसेंबरला सुरु होणार असून येत्या दोन दिवसांत 31 डिसेंबरला क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामने होणार आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागातही क्रिकेटच प्रचंड वेड आहे. पण या क्रिकेट स्पर्धेत ही बक्षीस जगात भारी असल्यामुळे आता क्रिकेट स्पर्धा पाहायला येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढणार आहे. चक्क बोकड आणि कोंबडे बक्षीस असल्याने क्रिकेटप्रेमी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आपल्या बक्षिसांवर चांगलाच ताव मारणार आहेत.

31 फर्स्ट निमित्त क्रिकेट प्रेमीसाठी आमच्या यंगस्टार क्रिकेट क्लब माडाचापाडा कडून अस्सल मांसाहारी चषक 2022 भव्य अंडरआर्म क्रिकेट सामनेचे आयोजन करण्यात आले असुन हे सामने गुरुवार 29 डिसेंबर पासून खेळवले जातील. तसेच विजेत्या संघाला रोख स्वरूपात बक्षीस न देता प्रथम विजेत्या संघाला बोकड,द्वितीय विजेत्या संघाला 10 गावठी कोंबडे,तृतीय विजेत्या संघाला 5 गावठी कोंबडे दिले जातील.

- संजय बरफ(यंगस्टार क्रिकेट क्लब सदस्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची झाली ऑनलाइन बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT