कोल्हापूर

एक वेळ होती 9 रुपयांना मटण थाळी, अनलिमिटेड तांबडा-पांढरा मिळायचा

या दिवसांत जुन्या काळातील काही बाजाराच्या काही लिस्ट किंवा काही बोर्ड सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

स्नेहल कदम

या दिवसांत जुन्या काळातील काही बाजाराच्या काही लिस्ट किंवा काही बोर्ड सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

कोल्हापूर - सध्या महागाईमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनानंतरच्या काळात अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिक, शेतकरी सर्वांच्या खिशाला कात्री लागली आहे. सहज पहायला गेले तर दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने लोक त्रस्त झाले आहेत. यात घरगुती गॅसची वाढलेली किंमत, भरमसाठ वाढलेले पेट्रोल, डिझेलचे दर, एसटीच्या तिकीटांचे वाढलेले दर एकंदरीतच काय तर लोक अक्षरश: या सगळ्याला वैतागले आहेत.

दरम्यान अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. या दिवसांत जुन्या काळातील बाजाराच्या काही लिस्ट किंवा काही बोर्ड, फलक सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये डाळ, पीठ, खोबरं, चिवडा अशा लिस्टमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दर अगदी मोजकेच दिसतात. म्हणजे खाद्यतेल, डाळ यांची किंमत अगदी २ ते ३ रुपये किलो अशी दिसते. यावरून हे बोर्ड चर्चेत येत असतात.

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. एसटीनेही दरवाढ केली आहे. यासोबत हॉटेल व्यावसायिक आणि इतर काही व्यापारी यांनीही वस्तूंचे दर वाढवले आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिकांना बराच तोटा सहन करावा लागला. मात्र यानंतर आता सर्व सुरळीत झाले आहे. दरम्यान सध्या एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात कोल्हापूरचा तांबडा - पांढारा रस्सा आणि मटणाच्या ताटाचे दर दिले आहेत. आता जी आपण अनलिमिटेड थाळी म्हणतो, ती त्या काळी फक्त ९ रुपयाला मिळत होती. आता मात्र तीच किंमत २०० च्या पार गेली आहे. या फलकात सांगितल्याप्रमाणे यात पाच पदार्थांचा समावेश आहे. १ मटण प्लेट, ३ चपाती, २ प्लेट पुलाव, १ वाटी पांढरा रस्सा आणि एक वाटी तांबडा रस्सा. अशी ही नॉनव्हेज थाळीची किंमत फक्त ९ रुपये आहे.

यात दिलेले दर हे सर्वसामान्य माणसाला परवडणारे आणि त्याकाळी म्हणजे अगदी १९८५-८६ च्या काळात ही थाळी ९ आणि ७ रुपयांना येत होती. असे काही जुने मेसेज सोशल मिडियावर फिरु लागले की, जुन्या आठवणी ताज्या होतात. अनलिमिटेड थाळीसाठी त्याकाळचे ९ रुपये कुठे आणि आताचे २०० रुपये कुठे. काही का असेना या चमचमीत, झणझणीत पांढरा-तांबडा रस्स्याची किंमत कितीही वाढली तरी खवय्ये यावर ताव मारणे सोडणार नाहीत हे पक्क आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT