India Aghadi Shiv-Shahu Sadbhavna Yatra Kolhapur esakal
कोल्हापूर

विशाळगड दंगलीच्या निषेधार्थ शाहू महाराज, सतेज पाटलांच्या नेतृत्‍वात कोल्हापुरात 'इंडिया आघाडी'ची शिव-शाहू सद्‌भावना यात्रा

सकाळ डिजिटल टीम

सद्‌भावना फेरीच्या पार्श्वभूमीवर नर्सरी बाग ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

कोल्हापूर : ‘हिंदू-मुस्लिम, शीख, इसाई हम सारे भाई भाई,’ असा नारा देत समतेच्या नगरीत सर्व धर्मीयांत एकीची वज्रमूठ कशी असू शकते, याची प्रचिती येथे आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय, भारत माता की जय, अशा घोषणा देत शाहूनगरीतील सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. निमित्त होते इंडिया आघाडीतर्फे (India Aghadi) गजापुरात घडलेल्या दंगलीच्या निषेधार्थ आयोजित शिव-शाहू सद्‌भावना फेरीचे.

खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्‍वाखाली फेरीचे आयोजन केले होते. नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी परिसरातून त्यास सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन भारत माता की जयसह छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या घोषणा देत ही फेरी सीपीआरच्या चौकात पोहोचली.

शिव-शाहूप्रेमी कार्यकर्त्यांतून समाजातील ऐक्य बळकट ठेवण्याचा संदेश देण्यात येत होता. टाऊन हॉल बाग, भाऊसिंगजी रोड, महापालिका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा फेरीचा मार्ग राहिला. येथे पोहोचल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीताने फेरीची सांगता झाली.

आमदार प्रा. जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शाहू सलोखा मंचचे वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, कादर मलबारी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, माजी महापौर आर. के. पोवार, प्रा. डॉ. मेघा पानसरे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, जिल्हा व शहर तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, कॉंग्रेसचे सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजू लाटकर, शारंगधर देशमुख, भारती पोवार, ए. वाय. पाटील, राहुल पाटील, प्रा. उदय नारकर, गिरीश फोंडे, पद्मजा तिवले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीश्‍चंद्र कांबळे, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, सुधा सरनाईक, भारती दिवसे, अशोक भंडारे, माणिक मंडलिक, विद्या पोवार, गीता हसूरकर, मालती दुर्गुळे, छाया देव, भारती काळे, रूपाली बराले, सुनीता कारंडे, रामराजे कुपेकर, डॉ. सुभाष जाधव, माजी प्राचार्य आर. डी. पाटील फेरीत सहभागी झाले होते.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

सद्‌भावना फेरीच्या पार्श्वभूमीवर नर्सरी बाग ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. डोक्यावर पांढऱ्या टोप्या घातलेले कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT