Vishalgad Encroachment Dispute esakal
कोल्हापूर

Vishalgad Violence: विशाळगडावरील कारवाईला कोर्टाची स्थगिती! पोलीस अधिकाऱ्याला हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश

याचिकाकर्त्यानं सादर केलेल्या व्हिडिओत 'जय श्रीराम'चे नारे देत जमावानं केला हिंसाचार

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विशाळगड हिंसाचार प्रकरणात आता नवी अपडेट आली आहे. हायकोर्टानं इथं सुरु असलेल्या सरकारच्या अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती दिली आहे. तसंच तोडफोड होत असताना कायदा-सुव्यवस्था राखू न शकलेल्या शाहूवाडी पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्याला हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

साम टीव्हीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, मॉन्सूनकाळीतील कारवाई तात्काळ थांबवण्याचे तसेच सप्टेंबरपर्यंत कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं प्रशासनाला दिले आहेत. तसेच शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या मुख्य पोलीस अधिका-याला हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

याचिकाकर्त्यांनी विशाळगड आणि परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या दिवशीचे व्हिडिओ कोर्टात सादर केले. या व्हिडिओंमध्ये तोडफोड करणारे लोक 'जय श्री राम'चा नारा देत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे. तिथं उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाला थांबवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही उलट त्यांना तोडफोडीसाठी मोकळीक दिल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं हायकोर्टात केला.

दरम्यान, विशाळगडावर तोडफोड होत असताना सरकार काय करत होत? तसंच कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची? असा सवालही हायकोर्टानं सरकारला आणि पोलीस प्रशासनाला विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidates: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, चार उमेदवारांमध्ये कोणाची नावे?

Nita Ambani : नीता अंबानींची मोठी घोषणा! १ लाखांहून अधिक महिला अन् बालकांसाठी कर्करोग,हृदयविकाराचे मोफत उपचार

आणि रणवीरला सेटवरून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं ; हे होतं कारण

Bandra Stampede: "रेल्वे प्रशासनाची बेफिकिरी जिवावर बेतली..."; वांद्रे चेंगराचींगरी दरम्यान पोलीस काय करत होते?

Sinhagad Accident: सिंहगडावरून व्यक्ती २५० फूट खोल दरीत कोसळला

SCROLL FOR NEXT