Dog Handler Vishwajeet Jadhav esakal
कोल्हापूर

Ratan Tata : रतन टाटांचा 'डॉग हॅण्डलर' आहे कोल्हापूरचा; श्‍वानांची नावे आहेत 'T' अद्याक्षरावरून, जाणून घ्या कोणती..

लुमाकांत नलवडे

''माझ्यासोबत अन्य काही प्रशिक्षणार्थी असायचे. पण, टाटांनी कधीही कोणालाही रागावले नाही. काही चूक झाली तरीही ते शांततेने सांगत होते.''

कोल्हापूर : टॅंगो, टिपू, टायसन, टारा, टेजा... उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या पुण्यातील ‘लेक हाऊस''मध्ये असणाऱ्या श्‍वानांची ही नावे आहेत. प्रत्येक श्‍वानाचे नाव ‘टी’ वरूनच आहे. ही माहिती सांगत होते टाटांकडील ‘डॉग हॅण्डलर’ (Dog Handler) विश्‍वजित जाधव. ते मूळचे येथील सम्राटनगर परिसरातील आहेत.

जाधव (Vishwajit Jadhav) सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये (Central Industrial Security Force) नोकरी करीत होते. बिहारमध्ये नोकरी करत असताना त्यांना टाटांच्या पुण्यातील प्रकल्पावर बोलावण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण करून ते पुण्यात रूजू झाले. त्यांना कंपनीत नोकरी न देता लेक हाऊसमध्ये देण्यात आली. तेथे सात-आठ श्‍वान आहेत. त्यांची देखभाल, ट्रेनिंग करण्याचे काम त्यांच्याकडे आहे.

रतन टाटा जेव्हाही पुण्यात येत होते, तेव्हा ते सायंकाळी श्‍वानांकडे येत. त्यांच्यासोबत खेळत होते. प्रत्येक श्‍वानाला ते नावानेच हाक मारत होते. श्‍वानही त्यांच्यासमोर नम्रतेने येत होते. अनेक वेळा टाटा पुण्यातील सायंकाळी श्‍वानांसोबतच राहत होते. जाधव सांगतात, ‘टाटा जेव्हा पुण्यात येतील तेव्हा आम्ही त्यांना श्‍वानांचा ‘डेमो’ देत होतो. श्‍वानांना काय शिकवले, त्यांची जपणूक कशी होते, याचीही माहिती त्यांना ‘डे टू डे’ दिली जात होती. ‘काळजी घ्या’ असे नम्रतेने ते आम्हाला सांगत होते.

माझ्यासोबत अन्य काही प्रशिक्षणार्थी असायचे. पण, टाटांनी कधीही कोणालाही रागावले नाही. काही चूक झाली तरीही ते शांततेने सांगत होते. नेहमी हसत राहत होते आणि हसत राहण्यासाठी सांगत होते. मुंबईतील त्याच्या बंगल्यातही श्‍वान आहेत. तेथील आणि पुण्यातील श्‍वानांबद्दल त्यांना आपुलकी होती. ते मनाने हळवे होते. त्यामुळे श्‍वानांना इजा होता कामा नये, याचीही ते काळजी घेण्यास सांगत होते. आज त्यांची आठवण येते. ते आजारी असल्यामुळे पुण्याकडे आले नाहीत. त्यामुळे बरेच दिवस झाले श्‍वानांचीही त्यांची भेट झाली नाही. ’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचा त्याग; अमित ठाकरेंसाठी शिवसेना 'हा' मतदारसंघ सोडणार

Latest Marathi News Live Updates: दामोदर शिंगडांचे पुत्र सचिन शिंगडा करणार मनसेत प्रवेश

Kajol Angry At Paparazi : "चप्पल काढून मंडपात या" ; पापाराझींवर काजोल भडकली, म्हणाली....

Noel Tata Net Worth: रतन टाटांचा मौल्यवान वारसा नोएल टाटांच्या खांद्यावर; किती आहे संपत्ती?

DSP Mohammed Siraj: 'दबंग' मोहम्मद सिराज; पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT