water supply stop in kolhapur city 
कोल्हापूर

...तर कोल्हापुरमधील या भागातील पाणीपुरवठा होणार बंद

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी (कोल्हापूर) - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गांधीनगरसह 13 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेला पाणीपुरवठा कपात व बंद करण्याची नोटीस प्राधिकरणाने सर्वाधिक थकबाकी असणाऱ्या उचगाव (2.59 कोटी) व उजळाईवाडी (1.82 कोटी) या गावांना दिली असून एक मार्च पासून या दोन गावांच्या पाणीपुरवठा मध्ये 50 टक्के कपात करण्यात येत असून थकबाकी भरण्यासाठी 10 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. 11 मार्चपासून थकबाकी न भरल्यास संपूर्ण पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा कपात व बंद होत असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळपाणी योजने अंतर्गत प्रादेशिक गांधीनगर नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. या नळपाणीपुरवठा योजनेंतर्गत उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, उंचगांव, गडमुडशिंगी, गांधीनगर, नेरली वळिवडे, कणेरी, पाचगांव, तामगाव या गावांसाठी ही योजना सध्या कार्यान्वित आहे. 

एक मार्चपासून पाणीपुरवठा मध्ये 50 टक्के कपात करण्यात येत आहे व 10 मार्च पर्यंत थकबाकी न भरल्यास 11 मार्चपासून पाणीपुरवठा बंदचा इशारा दिला आहे. जीवन प्राधिकरणाने सदर ग्रामपंचायतींना वेळोवेळी लेखी व तोंडी कळवुनही थकबाकी भरली नसल्याने अंतिम नोटिस बजावली असल्याचे नमुद केले आहे. माजिप्रच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून यासंदर्भात सक्त सुचना प्राप्त झाल्या आहेत. 

जीवन प्राधिकरण योजनेच्या थकबाकीमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली असल्याने प्राधिकरणाला कठोर पावले उचलावी लागत आहेत . अगोदरच वरिल सर्व गावातील नागरिकांची अनियमित, अपुरा व गढुळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नेहमीच होत असते. त्यातच पाणीपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागनार आहेत. 

डिसेंबर 2019 अखेर थकबाकी रक्कम 
ग्रामपंचायत उंचगाव ः 2,59,76, 461 रूपये 
ग्रामपंचायत उजळाईवाडी ः 1,82,99,480 रूपये 


थकबाकी आवाक्‍याच्या बाहेर... 
14 गावांत ही योजना आहे. उचगाव लोकसंख्येने मोठे गाव आहे. जीवन प्राधिकरण 18.90 रुपये प्रति हजार लिटर या प्रमाणे दर आकारणी करत असून ग्रामपंचायतींना नागरिकांच्या पर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी अनुषंगिक खर्च करावा लागतो. असे असूनही सर्वच गावांतील बहुतांश ग्रामपंचायती लोकांचा रोष ओढवून नये, यासाठी दरवाढ न करता सदर चा दर 12 ते 14 रुपये या दरानेच पाणी बिलाची आकारणी करत असल्यामुळे थकबाकीचा आकडा फुगत जाऊन ती थकबाकी आता आवाक्‍याच्या बाहेर गेली. 

उजळाईवाडी हे दुष्काळ ग्रस्त गाव म्हणून 2029 ला जाहीर झाले असून तत्कालीन शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त गावातील पाणी बिले व वीज बिले माफ होणार होती. तरी यासंबंधी निवेदनाद्वारे पालकमंत्री सतेज पाटील व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पाणीपुरवठा कपात अथवा खंडित न करण्याविषयी विनंती करणार आहोत. 
- सौ. सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी 

जीवन प्राधिकरणाला जॅकवेल व पंप हाऊस जलशुद्धीकरण केंद्र यासाठी लागणारी यंत्रे विद्युत देयके तुरटी क्‍लोरीन सिलेंडर व या सर्व कामांसाठी लागणारा कर्मचारी वर्ग यावरती खर्च करावा लागत असून सदरचा खर्च ग्रामपंचायती भरणाऱ्या रकमेतून भागविण्यात येतो. सर्वाधिक थकबाकी राहिली असून नाईलाजास्तव पाणीकपात व बंदची कारवाई करावी लागत आहे. 
- ए. डी. चौगुले, उपअभियंता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT