Radhanagari Dam esakal
कोल्हापूर

Kolhapur : राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत 20 फुटांनी वाढ; पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी

धरणक्षेत्रासह (Radhanagari Dam) पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली.

सकाळ डिजिटल टीम

यंदाच्या पावसाळ्यात या केंद्रातून पूर्ववत वीज निर्मिती सुरू करण्यासाठी तीन महिन्यापूर्वीच जनित्र संचाची विशेष देखभाल दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्याच्या (Kolhapur) ग्रामीण भागात पावसाचा (Rain) जोर वाढला असून, राधानगरी धरण क्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली. शहर परिसरातही जोरदार पाऊस झाला.

राधानगरीच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ

धरणक्षेत्रासह (Radhanagari Dam) पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात ८८ तर दाजीपुरात १२४ मिलिमीटर पाऊस झाला. आठवडाभरातील पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ झाली आहे.

पाऊस सुरू होण्यापूर्वी पाणी पातळी २८७ फूट इतकी होती. ती आज ३६० फुटापर्यंत पोहोचली आहे. काळम्मावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात पावणेदोन टीएमसीने वाढ झाली आहे. या धरण क्षेत्रात २४ तासांत ६७ तर तुळशीत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, आज दुपारपासून राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी ७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. संततधार पावसाने पाणीसाठ्यात होणारी वाढ नियंत्रित राखण्यासाठी बीओटी तत्त्वावरील वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. मात्र धरण पायथ्याशी असलेल्या आणि बंद करण्यात आलेल्या जुन्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीला महाजेनकोकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.

यंदाच्या पावसाळ्यात या केंद्रातून पूर्ववत वीज निर्मिती सुरू करण्यासाठी तीन महिन्यापूर्वीच जनित्र संचाची विशेष देखभाल दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू झाल्यानंत, जलसंपदाकडून वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्याची तयारी दर्शविण्यात आली. तरीही महाजनकोकडून काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

शिरगाव परिसरात शेतीकामांना गती

शिरगाव : गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने शेतकरी राजा सुखावला आहे. शेतीच्या खोळंबलेल्या कामांना आता गती आली आहे. भात रोपलावणीची काम अर्धवट राहिली होती. रोपलावणीसाठी चिखल गुट्टा करण्यासाठी पावसाचेच पाणी लागते, पण पावसाअभावी ही कामे खोळंबली होती. शिवारात आता पाणीच पाणी झाल्याने रोपलागणीच्या कामांना गती आली आहे.

तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर

धामोड : सकाळपासून येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. २४ तासात २९ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे . केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्प ३५ टक्के भरला आहे. दरम्यान, तुळशी धरणातून सोडण्यात आलेला नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे .

आंबा, विशाळगड परिसरात संततधार

आंबा ः तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबा, विशाळगड व दक्षिणेकडील येळवण जुगाई परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे भात रोपलावणीची धांदल उडाली आहे. संततधारेमुळे कडवी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

कडवी मध्यम प्रकल्पासह मानोली व कासार्डे येथील लघुपाटबंधारे तलावात पाणी पातळी वाढली आहे. आंबा घाटात पाऊस आणि धुके आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या भात रोप लावणीसाठी परळे निनाई, वाकोली, चांदोली, केर्ले, वारूळ, गजापूर भागात एकच धांदल उडाली आहे.

बोरपाडळे परिसरात रिपरिप

बोरपाडळे : बोरपाडळेसह शहापूर, माले , मिठारवाडी, आंबवडे, काखे, मोहरे आदी परिसरामध्ये गेले दोन दिवस आणि काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT