कोल्हापूर

महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख काळाच्या पडद्याआड

मतीन शेख, कोल्हापूर

शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या आप्पालाल यांना घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले. वडीलांना कुस्तीचा छंद.

कोल्हापूर : राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते तसेच महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे सुप्रसिध्द मल्ल आप्पालाल शेख यांचे काल गुरुवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. बोरामणी ता.दक्षिण सोलापूर या त्यांच्या मुळ गावी ते वास्तव्यास होते. त्यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या आप्पालाल यांना घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले. वडीलांना कुस्तीचा छंद. त्यांचे मोठे बंधू इस्माईल शेख तगडे मल्ल होते. 1980 साली त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. त्यांच्या समवेत आप्पालाल कोल्हापुरच्या शाहूपुरी तालमीत दाखल झाले. आपल्या बंधू कडून कुस्तीचा धडा घेत ते कोल्हापुरच्या मातीत रमले. मेहनत करत कमी कालावधीत त्यांनी चांगली प्रगती साधली. दिड हजार बैठका, जोर तसेच तासनतास कुस्तीचा सराव, भरपूर खुराक असा त्यांचा दिनक्रम असायचा.

विविध कुस्तीच्या फडात त्यांनी चांगल्या मल्लां बरोबर लढती देत विजयश्री मिळवला. बलदंड शरीर आणि पक्का डाव या जोरावर त्यांनी अनेक मल्लांना आस्मान दाखवले. याच काळात बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी आप्पालाल यांची निवड झाली. त्यात त्यांना यशाने हुलकावणी दिली. मात्र 1991 साली न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आणि त्यांच्या नावाचा डंका महाराष्ट्रासह देशात झाला.

या मोठ्या यशा नंतर देखील त्यांना महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद खुनावत होते. आपल्या भावा प्रमाणे आपण ही महाराष्ट्र केसरीची गदा जिंकावी असे स्वप्न बाळगून त्यांनी जोरात तयारी केली आणि 1992 साली महाराष्ट्र केसरीची गदा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. मोहम्मद हनीफ, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे आणि वस्ताद मुकुंद करजगार यांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार झाले. पुढे महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देत सन्मान देखील केला.

सख्या भावाच्या जोडीने महाराष्ट्र केसरीचा मान मिळवल्यामुळे कोल्हापूर, सोलापूर सह देशभराच्या क्रिडा मोठी चर्चा झाली. पहाटे रस्त्यावर व्यायामासाठी धावत असताना त्यांना मोटारीने धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांची कुस्ती थांबली. यानंतर त्यांचा वारसा त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख यांनी पुढे चालवला. मुन्नालाल यांनी आपल्या चुलत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुस्तीत चमक दाखवली आणि 2002 साली महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला. एकाच शेख कुटूंबातील तीन मल्लांनी महाराष्ट्र केसरीचे विजेते पद पटकावत नवा विक्रम प्रस्थापित केला.

आप्पालाल लंगोट लावून आखाड्यात उतरले की चांगल्या चांगल्या मल्लांची धडकी भरायची. शड्डू ठोकून प्रतिस्पर्धी मल्लाचे मनगडाची पकड घेतली की त्या मल्लांस चितपट करुनच ते मैदान सोडायचे अशी त्यांची खासीयत होती. सध्या गौसपाक, आशपाक आणि आस्लम ही त्यांची मुले कुस्तीचा वारसा पुढे चालवत आहेत. वडीलांचे ऑलिंपिकचे स्वप्न त्यांना पुर्ण करायचे आहे. आप्पालाल यांच्या जाण्याने कोल्हापुरच्या तांबड्या मातीत तयार झालेला एक हिरा निखळला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT